थंडीमध्येही केस राहतील लुसलुशीत! जाणून घ्या 'हे' घरगुती उपाय

Monika Shinde

कोंड्याची समस्या

थंडी वाढली की कोंड्याची समस्या वाढते. जाणून घ्या काही सोपे घरगुती उपाय, जे केसांना मऊ, चमकदार आणि निरोगी ठेवतील.

तीळ तेल आणि कढीपत्ता

तीळ तेल थोडं गरम करून त्यात कढीपानं टाका. केसांच्या मुळांवर मालिश करा. यामुळे केस मजबूत होतात आणि कोंडा कमी होतो.

आवळा आणि लिंबाचा जादू

आवळा रस आणि थोडा लिंबाचा रस एकत्र करून टाळूवर लावा. २० मिनिटांनी धुवा. यामुळे केसांना पोषण आणि चमक मिळते.

मेथीचा नैसर्गिक उपाय

रात्रभर भिजवलेली मेथी वाटून पेस्ट तयार करा. ती केसांच्या मुळांवर लावा. मेथीतील गुणधर्म कोंडा कमी करून केसांना बळकटी देतात.

कोरफड जेल थेरपी

कोरफड जेल टाळूवर ३० मिनिटं लावा आणि कोमट पाण्याने धुवा. हे टाळूला आर्द्रता देऊन कोंडा दूर करते आणि केस मऊ बनवते.

दही आणि मध मास्क

दही आणि एक चमचा मध एकत्र करून टाळूवर लावा. हे नैसर्गिक कंडिशनर केसांना मऊ ठेवते आणि कोरडेपणा कमी करते.

योग्य काळजीचे सवयी

खूप गरम पाण्याने केस धुवू नका. कोमट पाणी वापरा. नियमित तेल मालिश करा आणि केस झाकून ठेवा, त्यामुळे थंडीचा परिणाम कमी होतो.

लग्नाची तयारी करताय? पार्टनरला नक्की विचारा हे 5 प्रश्न!

येथे क्लिक करा