kimaya narayan
बॉलिवूडमध्ये एकेकाळी बोल्ड भूमिकांनी सगळ्यांची मनं जिंकणाऱ्या सुंदर अभिनेत्री म्हणजे झीनत अमान. सेक्स सिम्बॉल अशी ओळख त्यांना बॉलिवूडमध्ये मिळाली.
द इव्हल विदिन या सिनेमातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं पण त्यांना ओळख मिळाली हरे रामा हरे कृष्णा या सिनेमातून. त्यांची ही भूमिका खूप गाजली.
त्या घराघरात पोहोचल्या त्या सत्यम शिवम सुंदरम सिनेमाने. या सिनेमातील रूपा ही भूमिका सुपरहिट झाली.
अब्दुल्लाह सिनेमाच्या सेटवर झीनत यांची ओळख संजय खान यांच्याशी झाली आणि ते दोघं एकमेकांना डेट करू लागले. संजय विवाहित असून चार मुलांचे पिता होते.
झीनत यांच्या घरातून संजय यांच्याशी लग्न करण्याला विरोध असतानाही त्यांनी लग्न केलं. संजय यांचा हा दुसरा विवाह होता.
संजय हे त्यांच्या तापत स्वभावासाठी प्रसिद्ध होते. एकदा व्यस्त वेळापत्रकामुळे झीनत यांनी त्यांच्यासाठी गाणं शूट करण्यास नकार दिल्याने ताज हॉटेलमध्ये सगळ्या लोकांसमोर त्यांनी झीनत यांना मारहाण केली. यात झीनत यांचा जबडा तुटला आणि डोळ्याला मार लागला.
या प्रकरणानंतर झीनत यांनी संजय यांच्याशी घटस्फोट घेतला आणि मजहर खान यांच्याशी लग्न केलं. त्यांना दोन मुलं आहेत.