सकाळ डिजिटल टीम
रोल्स-रॉयस ही जगातील सर्वात प्रतिष्ठित लक्झरी कारपैकी एक आहे. पण तुम्हाला माहित आहे का? भारताच्या एका राजाने या गाड्यांचा अनोखा वापर केला! जाणून घ्या ही अद्भुत कहाणी.
हा किस्सा आहे अलवरच्या महाराजा जयसिंह प्रभाकर यांचा, जे शाही वैभवासाठी प्रसिद्ध होते. ते रोज अनेक वेळा कपडे बदलत आणि लक्झरी वस्तूंचे शौकीन होते.
सन 1920 मध्ये राजा जयसिंह प्रभाकर लंडनला गेले असताना, त्यांनी तिथे एका शोरूममध्ये सहा आलिशान रोल्स-रॉयस गाड्या पाहिल्या आणि त्या खरेदी करण्याचा निर्णय घेतला.
राजा साध्या वेशात शोरूममध्ये गेले होते, त्यामुळे सेल्समॅनला वाटले की ते एखादे सामान्य व्यक्ती आहेत. त्यांनी राजाला अपमानित करून बाहेर काढले!
राजाने आपल्या दूतांमार्फत पुन्हा शोरूमशी संपर्क साधला आणि सांगितले की भारताचा राजा भेट देणार आहे. यानंतर त्यांचा थाटात स्वागत करण्यात आले.
राजाने त्या सहा गाड्या विकत घेतल्या आणि भारतात पाठवण्यास सांगितले. मात्र, त्यांचा वापर वैयक्तिक प्रवासासाठी नव्हता...
भारतात पोहोचल्यानंतर, या गाड्यांचा वापर नगरपालिकेच्या कचरा उचलणाऱ्या वाहनांसाठी केला गेला! हे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले.
जेव्हा जगभर ही बातमी पसरली की भारतात रोल्स-रॉयस गाड्या कचरा उचलण्यासाठी वापरल्या जात आहेत, तेव्हा कंपनीची प्रतिमा धोक्यात आली आणि त्यांनी तत्काळ माफी मागितली.
रोल्स-रॉयस कंपनीने राजाची माफी मागून त्यांना सहा नवीन गाड्या भेट देण्याची ऑफर दिली. अखेरीस राजाने त्यांना माफ केले आणि हा ऐतिहासिक प्रसंग कायमचा इतिहास बनला!