Mumbai Untold Story : मुंबईत पडलेला 'सोन्याच्या' विटांचा पाऊस! तुम्हाला हे माहित्येय का?

सकाळ डिजिटल टीम

मुंबईत सोन्याच्या विटांचा पाऊस

मुंबईत एकेकाळी सोन्याच्या विटांचा पाऊस पडलेला आणि हे खरंय. मुंबईच्या इतिहासाची पानं चाळताना ही घटना समोर आली आहे.

Mumbai's Golden Rain 

|

esakal

१४ एप्रिल १९४४

मुंबईच्या इतिहासात १४ एप्रिल १९४४ हा दिवस एका भीषण दुर्घटनेमुळे कायमचा नोंदवला गेला.

जहाजाला आग अन्..

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात मुंबईच्या व्हिक्टोरिया डॉकमध्ये उभ्या असलेल्या SS Fort Stikine या ब्रिटिश मालवाहू जहाजाला अचानक आग लागली.

Mumbai's Golden Rain 

दोन प्रचंड स्फोट

या जहाजात कापसाच्या गाठी, लाकूड, तेल, सोन्याच्या लगडी आणि मोठ्या प्रमाणात स्फोटके होती. आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू असतानाच दोन प्रचंड स्फोट झाले.

Mumbai's Golden Rain 

|

esakal

घरांच्या छतावर कोसळलेले सोने

स्फोट इतका भीषण होता की गिरगावमधील बुर्जोर मोतीवाला नावाच्या एका नागरिकाच्या घराचे छत फोडून एक सोन्याची वीट थेट त्यांच्या घरात येऊन पडली होती.

Mumbai's Golden Rain 

|

esakal

९९९ रुपयांचे बक्षीस

मोतीवाला यांनी ती वीट पोलिसांच्या स्वाधीन केली, ज्याबद्दल सरकारने त्यांना ९९९ रुपयांचे बक्षीस दिले होते.

Mumbai's Golden Rain 

|

esakal

विटांचा पाऊस..

सेंट झेवियर्स कॉलेजच्या परिसरातही अशा विटा सापडल्याच्या नोंदी आहेत. काही विटा समुद्राच्या गाळात रुतून बसल्या.

Mumbai's Golden Rain 

|

esakal

२०११ मध्ये सापडल्या..

फेब्रुवारी २०११ मध्ये मुंबई पोर्ट ट्रस्टच्या गोदीत खोदकाम करणाऱ्या कामगारांना गाळातून सोन्याच्या विटा सापडल्या होत्या, ज्या पोलिसांनी 'ट्रेझर ट्रोव्ह ॲक्ट' अंतर्गत ताब्यात घेतल्या.

Mumbai's Golden Rain 

|

esakal

भीषण जीवितहानी

या दुर्घटनेत ८०० ते १,३०० लोकांचा मृत्यू झाला होता आणि सुमारे ८०,००० लोक बेघर झाले होते.

Mumbai's Golden Rain 

|

esakal

अग्निशमन दिन'

या आगीशी झुंज देताना मुंबई अग्निशमन दलाचे ६६ ते ७१ जवान शहीद झाले होते. त्यांच्या स्मरणार्थ आजही भारतात १४ एप्रिल हा दिवस 'राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिन' म्हणून पाळला जातो

Mumbai's Golden Rain 

|

esakal

Old Name of Mumbai

|

Sakal

<strong>मुंबईचे जुने नाव काय होते? जाणून घ्या शहराचा इतिहास!</strong>