Vinod Dengale
नसरापूर अत्याचार प्रकरणात विशेष न्यायालयाने भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा सुनावली आहे. मात्र त्याची अंमलबजावणी कधी होणार?
Death Sentence in India
eSakal
न्यायालयाने आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली म्हणजे ती तत्काळ अंमलात आणली जात नाही. त्यासाठी कायद्यानुसार घटनात्मक प्रक्रिया करणे बंधनकारक आहे.
Procedure
eSakal
यात सर्वप्रथम सत्र न्यायालयाने दिलेली फाशीची शिक्षा उच्च न्यायालयाच्या पुष्टीसाठी पाठविली जाते. उच्च न्यायालयाच्या मंजुरीशिवाय फाशीची शिक्षा अंमलात आणता येत नाही.
High Court
eSakal
उच्च न्यायालय पुरावे, साक्षी आणि खटल्याची संपूर्ण नोंद तपासून शिक्षा मान्य करणे, शिक्षा बदलणे किंवा आरोपीची निर्दोष मुक्तता करणे यापैकी कोणताही निर्णय देऊ शकते.
High Court Order
eSakal
उच्च न्यायालयाने फाशीच्या शिक्षेला मान्यता दिल्यानंतर दोषी व्यक्तीला सर्वोच्च न्यायालयात अपील करण्याचा अधिकार असतो.
Supreme Court
eSakal
सर्वोच्च न्यायालयापर्यंत अपील सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतरही दोषी व्यक्ती पुनर्विचार याचिका, त्यानंतर आवश्यक असल्यास क्युरेटिव्ह याचिका दाखल करू शकते.
Petition
eSakal
क्युरेटिव्ह याचिका म्हणजे एखाद्या प्रकरणात पुनर्विचार याचिकादेखील फेटाळल्यानंतर न्यायाच्या गंभीर त्रुटी झाल्याचा दावा करत दाखल करता येणारी शेवटची न्यायालयीन याचिका.
Curative Petition
eSakal
न्यायालयीन उपाय संपल्यावर दोषी व्यक्तीला राज्यपाल आणि राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज करण्याचा अधिकार आहे. दयेच्या अर्जावर निर्णय झाल्यानंतरच पुढील प्रक्रिया सुरू होते.
Mercy Petition to President
eSakal
सर्व न्यायालयीन आणि घटनात्मक पर्याय संपल्यानंतरच न्यायालय फाशीच्या शिक्षेच्या अंमलबजावणीसाठी आदेश जारी करते.
Death Penalty
eSakal
त्यानंतर कारागृह प्रशासन नियमावलीनुसार निश्चित तारखेला दोषी व्यक्तीला फाशीची शिक्षा देते.
Death Penalty Order
eSakal
Death Penalty vs Life Imprisonment: The Difference Most People Don’t Know
eSakal