Anushka Tapshalkar
वेळच्या वेळी केस कापले तर फाटे केसांना फाटे फुटणे, केस राठ होणे किंवा खराब होणे या समस्या कमी होतात, केसांची गुणवत्ता सुधारते आणि स्टाईलही टिकून राहते.
निरोगी आणि सुंदर केसांसाठी वेळच्या वेळी केस कापणे आवश्यक आहे.
समान लांबी टिकवायची असेल तर तुम्ही 6 ते 8 आठवड्यांनी केस कापले पाहिजेत. यामुळे केसांचे आरोग्य चांगले राहते आणि स्टाईल व्यवस्थित टिकते.
जर तुम्ही केस वाढवत असाल तर तुम्ही 8 ते 12 आठवड्यांनी केस ट्रिम करणे फायदेशीर ठरेल. यामुळे फाटे फुटलेले केस कापले जातात आणि केसांची निरोगी वाढ होते.
लहान केस असतील तर त्यांचा आकार टिकवण्यासाठी 4 ते 6 आठवड्यांनी कापणे गरजेचे असते. अन्यथा, केस अनियमित वाढून स्टाईल खराब होऊ शकते.
लांब केस असतील तर तुम्ही 8 ते 12 आठवड्यांनी केस ट्रिम केले पाहिजेत. यामुळे केसांना योग्य पोषण मिळते आणि फाटलेली टोकं कापल्याने केस तंदुरुस्त राहतात.
जर केस डॅमेज झाले असतील तर त्यांची सुधारणा करण्यासाठी आणि निरोगी वाढीसाठी 4 ते 6 आठवड्यांनी केस ट्रिम करणे आवश्यक असते. यामुळे केसांची मजबूती आणि चमक टिकून राहते.
कर्ली किंवा दाट केस असतील तर तुम्ही 8 ते 12 आठवड्यांनी ट्रिम केल्यास केसांचा नैसर्गिक पोत आणि आकार टिकून राहतो. तसेच, फ्रिझीनेस कमी होतो आणि केस सुंदर दिसतात.
पातळ किंवा बारीक केस असतील तर त्यांना भरगच्च आणि निरोगी ठेवण्यासाठी 6 ते 8 आठवड्यांनी केस ट्रिम करणे महत्त्वाचे आहे. यामुळे केस अधिक व्यवस्थित आणि सुंदर दिसतात.
कलर किंवा स्टाईल केलेले केस असतील तर त्यांचा तजेलदार लुक कायम राखण्यासाठी 6 ते 8 आठवड्यांनी ट्रिम करणे आवश्यक आहे. यामुळे केसांची गुणवत्ता टिकून राहते आणि स्टाईल देखील छान दिसते.