Vrushal Karmarkar
केंद्रातील मोदी सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत एक मोठा निर्णय घेतला आहे. पुढील जनगणनेत जातीय जनगणना समाविष्ट केली जाणार आहे.
सरकारने ठरवले आहे की, जातींची गणना जनगणनेतच केली जाईल. गेल्या काही वर्षांपासून विरोधी पक्ष जातीय जनगणनेची मागणी करत होते.
आता केंद्र सरकारने जनगणनेत जातीबद्दल विचारण्याचा निर्णय घेतला आहे. भारतातील शेवटची जनगणना २०११ मध्ये झाली होती.
ही स्वतंत्र भारताची सातवी जनगणना होती आणि आतापर्यंत ही देशाची एकूण १५ वी जनगणना मानली जाते. २०११ ची जनगणना दोन टप्प्यात करण्यात आली.
यामध्ये भारताची एकूण लोकसंख्या १२१ कोटींपेक्षा जास्त नोंदवण्यात आली होती. पण तुम्हाला माहिती आहे का भारतात शेवटची जातीय जनगणना कधी झाली होती?
भारतातील शेवटची संपूर्ण जाती-आधारित जनगणना १९३१ मध्ये ब्रिटिश राजवटीत झाली होती. ही तीच जनगणना होती ज्यामध्ये पहिल्यांदा आणि शेवटच्या वेळी सर्व जातींचा तपशीलवार डेटा गोळा करण्यात आला होता.
यानंतर १९४१ ची जनगणना करण्यात आली. परंतु दुसऱ्या महायुद्धामुळे ती अपूर्ण राहिली. स्वतंत्र भारतात १९५१ पासून फक्त अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) यांची गणना केली जात आहे.
त्यावेळी सर्वसाधारण वर्ग आणि मागासवर्गीय जातींची गणना केली जाणार नाही, असे धोरण आखण्यात आले. त्यामुळे जातीचा डेटा मर्यादित झाला. २०११ मध्ये सामाजिक-आर्थिक आणि जात जनगणना करण्यात आली.
परंतु त्यात गोळा केलेला जातीचा डेटा सरकारने सार्वजनिक केला नाही. कारण सुमारे ४६ लाख जातींची नावे आणि स्पेलिंगमधील फरकांमुळे डेटा पडताळणे आव्हानात्मक असल्याचे म्हटले जात होते.
बाजीराव आणि मस्तानीचा अंत कसा झाला?