संतोष कानडे
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आठवा वेतन आयोग लागू होणार आहे, केंद्र सरकारने आयोगाला मंजुरी दिली आहे
आठव्या वेतन आयोगामध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांचं वेतन मोठ्या प्रमामावर वाढणार असल्याची माहिती आहे
केंद्राने त्यांच्या कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागू केल्यानंतर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आयोग लागू होतो, असा प्रघात आहे
वेतन आयोगामध्ये फिटमेंट फॅक्टरच्या आधारा सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार ठरवले जातात. फिटमेंट फॅक्टर हे कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनावर लागू होते.
वेतन आयोग लागू करताना सध्याची महागाई, आर्थिक स्थिती, सरकारी तिजोरीची क्षमता आणि पुढच्या दहा वर्षांचा अभ्यास केला जातो.
सातव्या वेतन आयोगामध्ये फिटमेंट फॅक्टर हा २.५७ इतका होता. तर आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर २.८६ ते ३ टक्क्यांपर्यंत लाढू शकतो.
फिटमेंट फॅक्टरनुसार एखाद्या कर्मचाऱ्याचे मूळ वेतन २०,२०० इतके असेल तर आठव्या वेतन आयोगानुसार हा पगार ५१ हजार ४०० इतका होईल.
एखाद्या कर्मचाऱ्याचे मूळ वेतन ४० हजार असेल तर सध्याचे त्याचे वेतन १ लाख २ हजार असेल. तर आठव्या वेतन आयोगामध्ये त्याचं वेतन १ लाख १४ हजार रुपये इतकं होईल.
आठवा वेतन आयोग लागू होण्यासाठी २०२६ उजाडण्याची शक्यता आहे, आयोगाने आपला अहवाल सादर केल्यानंतर सरकार त्याला मंजुरी देईल.