Saisimran Ghashi
भारतीय इतिहासात महाराणा प्रताप यांचे नाव शौर्य आणि धैर्याचे प्रतीक म्हणून घेतले जाते.
महाराणा प्रताप यांचे वंशज अजूनही मेवाडमध्ये राहतात आणि त्यांच्या ऐतिहासिक वारशाची काळजी घेत आहेत.
मेवाडच्या राजघराण्याचे सदस्य आणि एचआरएच ग्रुप ऑफ हॉटेल्सचे अध्यक्ष अरविंद सिंग मेवाड यांचे 16 मार्च 2025 रोजी उदयपूर येथे निधन झाले आहे.
विश्वराज सिंह मेवाड हे सध्या महाराणा प्रताप यांचे प्रमुख वंशज आहेत आणि मेवाड राजघराण्याचे मुख्य सदस्य आहेत.
विश्वराज सिंह मेवाड हे महेंद्र सिंह मेवाड यांचे पुत्र आहेत. गेल्या वर्षी महेंद्रसिंग मेवाड यांचे निधन झाले. नंतर विश्वराज सिंह यांना कुटुंबाचा प्रमुख बनवण्यात आले.
महाराणा प्रताप यांचे वंशज उदयपूरच्या सिटी पॅलेसमध्ये राहतात, जो एक ऐतिहासिक किल्ला आहे.
मेवाड राजघराण्याचे प्रमुख विश्वराज सिंह मेवाड हे राजवाड्याच्या ऐतिहासिक मालमत्तेचे आणि किल्ल्याचे प्रमुख आहेत.
महाराणा प्रताप यांचे वंशज देशाच्या राजकारणात सक्रिय आहेत आणि त्यांच्या कुटुंबाचा प्रभाव आहे. विश्वराज सिंह मेवाड भाजप आमदार आहेत.
भागवत सिंग यांनी १९८४ मध्ये त्यांच्या मृत्यूपूर्वी त्यांची मालमत्ता अरविंद सिंह यांना दिली आणि त्यांनंतर ते कुटुंब प्रमुख झाले होते.