Saisimran Ghashi
मस्तानी हे बुंदेलखंड येथील महाराजा छत्रसाल यांच्या घराण्यातील होते. त्यांचे वडील छत्रसाल हे शिवाजी महाराजांचे अनुयायी होते.
जेव्हा उतार वयात महाराजा छत्रसाल यांच्या संस्थानांवर मुघल सरदार महंमद बंगश याने हल्ला केला तेव्हा पेशवा बाजीराव त्यांच्या मदतीला आला. त्याने बंगशचा पराभव केला व त्याला पळवून लावले.
या तरुण पेशव्याचा पराक्रम पाहून छत्रसाल महाराज बेहद खुश झाले. त्यांनी आपल्या राज्याचा एक तृतीयांश भाग पेशव्याला देऊन टाकला. इतकंच नाही तर मराठ्यांशी रक्ताचं नातं जोडायचं म्हणून बाजीराव पेशव्यानां आपली लाडकी मुलगी दिली, ती म्हणजे मस्तानी.
मस्तानी घोडेस्वारी, तलवारबाजी, आणि इतर युद्धकौशल्यात अत्यंत निपुण होती आणि ती नेहमी बाजीरावासोबत युद्ध मोहिमांमध्ये सहभागी होत असे.
मस्तानी आणि बाजीराव यांचा मुलगा कृष्णराव होता, ज्याचे दुसरे नाव समशेर बहादूर होते. त्याला पुण्याच्या ब्राह्मण समाजाने मुस्लिम म्हणून स्वीकारले.
समशेर बहादूर पानिपतच्या लढाईत शहीद झाला. त्याच्या साहसामुळे त्याला मोठा मान मिळाला.
समशेर बहादूरच्या वंशजांनी बांदा संस्थानातील नवाब पदाचा वारसा चालवला. त्याचे नातू अली बहादूर दुसरे, १८५७ च्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाले.
अली बहादूर दुसऱ्याने झाशीच्या राणीच्या पाठीशी उभं राहून स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला.
स्वातंत्र्य प्राप्तीपूर्वी अली बहादूर आणि त्यांचे वंशज ब्रिटिश नजरकैदेत ठेवले गेले होते.
आज मस्तानीचे वंशज भोपाळ, इंदौर, आणि सिहोरमध्ये राहतात. शादाब अली बहादूर यांचा सराफीचा व्यवसाय आहे आणि सिहोरमध्ये पारंपारिक शेती देखील त्यांच्याकडे आहे.
मस्तानीच्या वंशजांपैकी उमर अली बहादूर हे संस्कृत श्लोक मुखोद्गत करत आहेत आणि पुण्यातील ब्राह्मण समाजासोबत धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतात.