Pranali Kodre
दिग्गज अभिनेत्री नीना गुप्ता सध्या त्यांच्या पंचायतमधील भूमिकेमुळे चर्चेत आहेत. याचदरम्यान त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही चर्चा होत आहे.
यापूर्वीही अनेकदा नीना गुप्ता आणि वेस्ट इंडिजचे माजी क्रिकेटपटू सर विवियन रिचर्ड्स यांच्या रिलेशनशीपबद्दलही अनेकदा चर्चा झाल्या आहेत. पण ते पहिल्यांदा कधी भेटले होते? जाणून घेऊ.
निना यांच्या 'सच कहु तो' या आत्मचरित्रात विव रिचर्ड्स यांच्यासोबतच्या नात्याबद्दल खुलासा करण्यात आला आहे.
निना यांनी लिहिलं आहे की त्या आणि विव रिचर्ड्स पहिल्यांदा जयपूरच्या महाराणींच्या डिनर पार्टीत भेटले. त्याआधी त्यांचा सामना स्टेडियममध्ये पाहिला होता.
पहिल्या भेटीत त्यांची चांगली बाँडिंग झालेली, पण नंतर रिचर्ड्स परत मायदेशी गेल्याने त्यांचा संपर्क तुटला. कारण त्यांनी एकमेकांना संपर्क करू शकतो अशी कोणतीच माहिती दिली नव्हती.
मात्र दिल्लीत विमानतळावर पुन्हा झालेल्या अचानक भेटीनंतर त्यांचं नातं फुललं. त्यांच्यात मैत्री झाली आणि पुढे त्यांच्यात अफेअर झालं.
रिचर्ड्स परत गेल्यानंतर निना यांना कळलं की त्या गरोदर आहेत.यावेळी आजूबाजूचे सल्ले आणि भीती यामध्ये त्या गोंधळून गेल्या.
निना यांना वाटलं की निर्णय घेण्याआधी बाळाच्या वडिलांची सहमती आवश्यक आहे. त्यामुळे त्यांनी फोनवर बोलून रिचर्ड्स यांचं मत विचारलं. त्यावेळी रिचर्ड्स यांनी निना यांच्या निर्णयाला पाठिंबा दिला.
रिचर्ड्स यांच्या पाठिंब्यामुळे निना यांना वाटलं की त्यांचा योग्य निर्णय आहे. त्यानंतर १९८९ मध्ये निना यांनी मसाबाला जन्म दिला. तिला एकटीनेच वाढवण्याचे धाडसही निना यांनी पेलले.
निना यांनी रिचर्ड्स यांच्यासोबत लग्न केले नाही. रिचर्ड्स यांचे आधीच लग्न झालेले होते. पण त्याबद्दल निना यांनी कधीही रिचर्ड्स यांना दोषीही ठरवलं नाही.