जगातील पहिला ख्रिसमस कुठे साजरा झाला? जाणून घ्या रंजक इतिहास

सकाळ डिजिटल टीम

पहिला ख्रिसमस

जगातील पहिला ख्रिसमस कुठे आणि कसा साजरा करण्यात आला जाणून घ्या.

first Christmas celebration

|

sakal 

अधिकृत सुरुवात (रोम)

इतिहासातील नोंदीनुसार, जगातील पहिला अधिकृत ख्रिसमस ईसवी सन ३३६ मध्ये रोम (सध्याचे इटली) येथे साजरा झाल्याचे म्हंटले जाते.

first Christmas celebration

|

sakal 

रोमन सम्राट

ख्रिश्चन धर्म स्वीकारणारा पहिला रोमन सम्राट कॉन्स्टँटाइन (Constantine the Great) याच्या कार्यकाळात नाताळ साजरा करण्याची अधिकृत परंपरा सुरू झाली.

first Christmas celebration

|

sakal 

सर्वात जुनी नोंद

ख्रिसमसच्या पहिल्या उत्सवाचा उल्लेख 'क्रोनोग्राफ ऑफ ३५४' (Chronograph of 354) नावाच्या एका प्राचीन रोमन हस्तलिखितामध्ये आढळतो.

first Christmas celebration

|

sakal 

२५ डिसेंबरची निवड का?

प्रभू येशूंचा जन्म नक्की कोणत्या तारखेला झाला, याचे बायबलमध्ये उल्लेख नाहीत. परंतु, रोममधील हिवाळी संक्रांतीच्या (Winter Solstice) काळामुळे ही तारीख निवडली गेली असावी.

first Christmas celebration

|

sakal 

सूर्य देवतेचा उत्सव

ख्रिसमस सुरू होण्यापूर्वी रोममध्ये २५ डिसेंबरला 'सोल इन्विक्टस' (अजेय सूर्य) या सूर्य देवतेचा उत्सव साजरा केला जात असे. ख्रिश्चन धर्माच्या प्रसारानंतर हा दिवस येशूंचा जन्मदिवस म्हणून पाळला जाऊ लागला.

first Christmas celebration

|

sakal 

सणाचे मूळ नाव

सुरुवातीच्या काळात याला 'ख्रिसमस' म्हटले जात नव्हते, तर त्याला प्रभू येशूंच्या अवताराचा सण मानले जाई.

first Christmas celebration

|

sakal 

हिवाळी सण

युरोपातील कडाक्याच्या थंडीत सूर्य प्रकाश कमी असतो, अशा वेळी 'जगाचा प्रकाश' म्हणून येशूंच्या जन्माचा सण साजरा करणे लोकांना अधिक जवळचे वाटले.

first Christmas celebration

|

sakal 

जागतिक स्वरूप

९ व्या शतकापर्यंत ख्रिसमस हा युरोपभर एक प्रमुख सण म्हणून ओळखला जाऊ लागला आणि मध्ययुगात याला सध्याचे भव्य स्वरूप प्राप्त झाले.

first Christmas celebration

|

sakal 

मुघलांचे वंशज आता कुठे आहेत अन् काय करतात?

Mughal descendant life today

|

esakal

येथे क्लिक करा