इराणचे नेते आयतुल्लाह अली खामेनेई कुठं लपलेत? गुप्त बंकर कुठे आहे?

Shubham Banubakode

इराणवर हल्ला

इस्त्रायलने इराणची राजधानी तेहरानवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांच्या घरालाही लक्ष्य करण्यात आलं आहे.

खामेनेई कुठे आहेत?

या हल्ल्यानंतर अली खामेनेई आणि त्यांचे कुटुंब तेहरानजवळील लवीजान परिसरातील गुप्त बंकरमध्ये असल्याची चर्चा आहे.

कुठं आहे लवीजान?

लवीजान हा तेहरानच्या ईशान्य भागातील लष्करी आणि अणु संशोधनासाठी ओळखला जाणारा अत्यंत संवेदनशील असा परिसर आहे.

बंकरची वैशिष्ट्ये

हे बंकर जमिनीखाली ९० ते १०० मीटर किंवा त्याहून अधिक खोलीवर असल्याची माहिती आहे.

हवाई हल्ल्यांपासून संरक्षण

या ठिकाणी हवाई हल्ल्यांपासून संरक्षण देणारी मजबूत सुरक्षा व्यवस्था असल्याचे सांगितले जाते.

कुटुंबासह कडक सुरक्षा

खामेनेई यांच्यासोबत त्यांचा मुलगा मुजतबा आणि कुटुंबीय असल्याची माहिती आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी विशेष पथक तैनात करण्यात आलं आहे.

यापूर्वीही झाला वापर

गेल्या वर्षीही इस्रायल-इराण यांच्यात तणाव निर्माण झाला होता. त्यावेळी खामेनेई यांनी ठिकाणी आश्रय घेतला होता.

का महत्त्वाचे आहे हे ठिकाण?

जर अमेरिका किंवा इस्रायलने खामेनेईंना लक्ष्य केले तर इराणमध्ये उलथापालथ होऊ शकते. त्यामुळे हे बंकर सध्या चर्चेत आहे.

दिल्लीतील इंडिया गेट बनवायला किती खर्च आला होता?

India Gate Construction Cost

|

esakal

हेही वाचा -