आपल्या शरीरात रक्त कसं आणि कुठे तयार होतं?

Shubham Banubakode

रक्त कुठे तयार होतं?

शरीरात रक्तपेशी मुख्यतः अस्थिमज्जेत (Bone Marrow) तयार होतात. हाडांच्या आत असलेली ही मऊ, स्पंजासारखी ऊती रक्तपेशी तयार करण्याचं काम करते.

Where Is Blood Produced in Human Body

अस्थिमज्जा म्हणजे काय?

अस्थिमज्जा म्हणजे हाडांच्या आतील भागात असलेली मऊ ऊती. यामध्ये रक्त तयार करणाऱ्या स्टेम सेल्स असतात. या पेशी पुढे रक्तपेशींमध्ये विकसित होतात.

Where Is Blood Produced in Human Body

लाल रक्तपेशी

लाल रक्तपेशी (Red Blood Cells) प्रामुख्याने लाल अस्थिमज्जेत तयार होतात. त्यांचं मुख्य काम फुफ्फुसांमधून ऑक्सिजन शरीराच्या विविध भागांपर्यंत पोहोचवणं असतं.

Where Is Blood Produced in Human Body

WBC

पांढऱ्या रक्तपेशी (White Blood Cells) तयार होण्यातही अस्थिमज्जेची महत्त्वाची भूमिका असते. या पेशी संसर्गाशी लढण्यास मदत करतात.

Where Is Blood Produced in Human Body

प्लेटलेट्सचं काय?

रक्त गोठवण्यासाठी आवश्यक असलेले प्लेटलेट्स देखील अस्थिमज्जेत तयार होतात. शरीराला जखम झाल्यानंतर रक्तस्राव थांबवण्यासाठी प्लेटलेट्स महत्त्वाचे असतात.

Where Is Blood Produced in Human Body

हिमॅटोपोएसिस

रक्तपेशी तयार होण्याच्या आणि विकसित होण्याच्या प्रक्रियेला हिमॅटोपोएसिस (Haematopoiesis) म्हणतात.

Where Is Blood Produced in Human Body

प्रक्रियेचं नाव

या प्रक्रियेत स्टेम सेल्सपासून लाल रक्तपेशी, पांढऱ्या रक्तपेशी आणि प्लेटलेट्स यांसारख्या पेशी विकसित होतात.

Where Is Blood Produced in Human Body

रक्तपेशी नंतर काय?

अस्थिमज्जेत तयार झालेल्या रक्तपेशी पूर्णपणे परिपक्व झाल्यानंतर त्या रक्तप्रवाहात सोडल्या जातात. त्यानंतर त्या शरीरातील आपापली कामं पार पाडतात.

Where Is Blood Produced in Human Body

गुप्तधन अन् सापांचं कनेक्शन खरं की केवळ गैरसमज? जाणून घ्या

snakes guard buried treasure

|

 esakal

हेही वाचा-