Payal Naik
अनेक जुने चित्रपट आजही प्रेक्षकांच्या आवडीचे आहेत. हे चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात.
त्यातलाच एक चित्रपट म्हणजे महेश कोठारे यांनी दिग्दर्शित केलेला 'धूम धडाका'.
१९८५ मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट आजही टीव्हीवर आवडीने पाहिला जातो
या सिनेमात मराठी सिनेसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांनी काम केलं. त्यात अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे हे कलाकार होते.
यासोबतच निवेदिता सराफ, प्रेमा किरण, सुरेखा-ऐश्वर्या राणे, शरद तळवळकर, भालचंद्र कुलकर्णी, बिपिन वारती हे कलाकारदेखील मुख्य भूमिकेत आहेत.
या चित्रपटातील अनेक डायलॉग आणि गाणी आजही प्रेक्षकांच्या तोंडावर आहेत. विख्खी, व्याख्या, वुख्खू हा अशोक सराफ यांचा हा डायलॉग आजही लोकप्रिय आहे.
या चित्रपटाचं शूटिंग कोणत्या जिल्ह्यात झालंय हे तुम्हाला ठाऊक आहे का?
'धुम धडाका' या सिनेमाचं शूटींग कोल्हापूर जिल्ह्यात झालं आहे. कोल्हापूरच्या ग्रामीण भागात या सिनेमाचे अनेक सीन शूट झालेत.
या चित्रपटासोबतच अनेक जुन्या चित्रपटाचं शूटिंग कोल्हापूर जिल्ह्यात झालं आहे.
मुंगूस रस्ता ओलांडताना एकमेकांची शेपटी का पकडतात? रस्ता चुकेल म्हणून नाही तर...