Shubham Banubakode
IPLच्या यंदाच्या हंगामात मुंबई इंडियन्सने विग्नेश पुथूर आणि अश्वनी कुमार हे दोन नवे चेहरे दिले आहेत.
चेन्नईविरुद्धच्या सामन्यात विग्नेश पुथूरने तीन, तर केकेआर विरुद्धच्या सामन्यात अश्वनी कुमारने चार बळी घेत सर्वांचंच लक्ष वेधलं.
मात्र, फारसे देशांतर्गत क्रिकेट न खेळलेले असे खेळाडू मुंबई इंडियन्सला कसे मिळतात? तुम्हाला माहितीये का?
इतर अनेक संघाप्रमाणे मुंबई इंडियन्सच्या संघाकडेही टॅलेंट स्काउट आहे.
हे टॅलेंट स्काउट देशाच्या कानाकोपऱ्यात खेळाडू शोधण्याचं काम करतात.
देशांतर्गत खेळल्या जाणाऱ्या विविध स्पर्धांदरम्यान या टॅलेंट स्काउटचे सदस्य उपस्थित असतात.
या स्पर्धेतील खेळाडूंच्या कामगिरीकडे या सदस्यांचं बारकाईने लक्ष असतं.
या स्पर्धांमधून काही खेळाडू निवडले जाते. त्यांना ट्रायलसाठी बोलावलं जातं.
ट्रायलनंतर काही खेळाडूंची नावं संघ व्यवस्थापना दिली जातात. संघ व्यवस्थापन त्यावर चर्चा केली जाते.
पुढे या खेळाडूंना मुंबईत सरावासाठी पाठवलं जातं. इथेच त्यांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था असते.
विग्नेश पुथूर, अश्वनी कुमार, बेव्हॉन जेकब्ज, अलाह गनफझर आणि रॉबिन मिन्झ हे मुंबईच्या टॅलेंट स्काऊटने हेरलेले काही खेळाडू आहेत.