राज्यघटनेची 'ही' २० कलमे राजकीय व्यवस्थेचा कणा मानली जातात, आताच जाणून घ्या...

Mansi Khambe

संविधानांचा संग्रह

भारताचे संविधान हे विविध देशांच्या संविधानांचा संग्रह आहे. त्याचा मसुदा तयार करण्यासाठी एकूण २ वर्षे, ११ महिने आणि १८ दिवस लागले.

Constitution Articles

|

ESakal

लोकशाही व्यवस्था

संविधानातील कलमे ही भारताच्या लोकशाही व्यवस्थेचा आणि नागरिकांच्या हक्कांचा कणा मानली जातात. यांपैकी २० कलमे अशी आहेत, ज्यांची माहिती सामान्य नागरिकांनाही असायला हवी.

Constitution Articles

|

ESakal

मूलभूत हक्क

संविधान समानतेचा हक्क आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क प्रदान करते. कलम १४ हे कलम कायद्यासमोर समानता सुनिश्चित करते. याअंतर्गत, सर्व नागरिक कायद्याच्या दृष्टीने समान असतील.

Constitution Articles

|

ESakal

अस्पृश्यता

कलम १७ हे कलम त्यामुळे भारतातील अस्पृश्यता समूळ नष्ट होते. असे करणे हा शिक्षेस पात्र गुन्हा आहे. कलम १९ हे यात भारतातील कोठेही भाषण, सभा, संघटना आणि संचार स्वातंत्र्याचे वर्णन आहे.

Constitution Articles

|

ESakal

अनुच्छेद

कलम २१ हा एक महत्त्वाचा अनुच्छेद आहे, जो सांगतो की कायद्याने स्थापित केलेल्या कार्यपद्धतीशिवाय कोणत्याही व्यक्तीला त्याच्या जीवनापासून किंवा वैयक्तिक स्वातंत्र्यापासून वंचित केले जाऊ शकत नाही.

Constitution Articles

|

ESakal

घटनादुरुस्ती

कलम २१अ हे कलम ८६ व्या घटनादुरुस्तीद्वारे जोडण्यात आले. जे ६ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांसाठी मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाची तरतूद करते.

Constitution Articles

|

ESakal

संविधानाचा आत्मा

कलम ३२ या संविधानाला "संविधानाचा आत्मा आणि हृदय " म्हटले आहे. यानुसार, नागरिकांच्या हक्कांचे उल्लंघन झाल्यास ते थेट सर्वोच्च न्यायालयात दाद मागू शकतात.

Constitution Articles

|

ESakal

मूलभूत कर्तव्य

कलम ५१अ हे नागरिकांच्या ११ मूलभूत कर्तव्यांबद्दल आहे, जसे की राष्ट्रध्वजाचा आदर करणे आणि पर्यावरणाचे रक्षण करणे इत्यादी. कलम ५२ याअंतर्गत भारताला एक राष्ट्रपती असेल.

Constitution Articles

|

ESakal

राष्ट्रपती

कलम ६१ यात संविधानाच्या उल्लंघनाच्या कारणास्तव राष्ट्रपतींना पदावरून दूर करण्याची प्रक्रिया नमूद केली आहे.

Constitution Articles

|

ESakal

क्षमादान

कलम ७२ हे राष्ट्रपतींच्या क्षमादानाच्या अधिकाराबद्दल आहे, ज्यानुसार गुन्हेगाराची शिक्षा कमी करण्याचा किंवा क्षमा करण्याचा अधिकार मिळतो.

Constitution Articles

|

ESakal

सर्वोच्च कायदेशीर

कलम ७४ यामध्ये राष्ट्रपतींना साहाय्य व सल्ला देण्यासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाची तरतूद आहे. कलम ७६ हे भारत सरकारच्या सर्वोच्च कायदेशीर अधिकाऱ्याच्या नियुक्तीसंबंधी आहे.

Constitution Articles

|

ESakal

लोकसभा

कलम ११० हे अर्थ विधेयकाशी संबंधित आहे, जे केवळ लोकसभेतच मांडले जाऊ शकते. कलम १२४ हे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्मिती आणि स्थापनेबद्दल आहे.

Constitution Articles

|

ESakal

सर्वोच्च न्यायालय

कलम १४३ हे प्रकरण राष्ट्रपतींनी एका कायदेशीर प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाकडून सल्ला मागण्यासंबंधी आहे. कलम २८० यामध्ये केंद्र आणि राज्यांमध्ये करांचे वितरण करण्यासाठी दर ५ वर्षांनी वित्त आयोगाच्या स्थापनेची तरतूद आहे.

Constitution Articles

|

ESakal

निवडणूक

कलम ३२४ हे निवडणूक आयोगाशी संबंधित आहे, जे निवडणुकांचे संचालन आणि नियंत्रणाविषयी माहिती देते.

Constitution Articles

|

ESakal

व्यवस्था

कलम ३५६ घटनात्मक व्यवस्था अयशस्वी झाल्यास कोणत्याही राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याविषयी हे आहे. कलम ३६८ ते संसदेला संविधानात बदल किंवा दुरुस्ती करण्याचे अधिकार देते.

Constitution Articles

|

ESakal

सापांना कान नसतात, तरी ते गारुड्याच्या पुंगीचा आवाज कसा ऐकतात? उत्तर जाणून व्हाल थक्क

Snake hearing mechanism

|

ESakal

येथे क्लिक करा