Pranali Kodre
पावसाळा आला की डासांचाही त्रास वाढतो. अनेकदा डासांमुळे आजारही होतात.
काहीवेळेस असे दिसते की काही विशिष्ट लोकांकडे डास अधिक आकर्षित होतात.
पण तुम्हाला माहित आहे का डास काही विशिष्ट रंगांकडेही अधिक आकर्षित होतात.
साधारत: काळा, गडद निळा, लाल हे रंग डासांना अधिक आकर्षित करतात.
University of Washington एका आभ्यासात असे आढळले की यलो फिव्हरचा आजार देणाऱ्या डासांना लाल, नारंगी, मोरपंखी रंग अधिक आकर्षित करतात.
पण, हे देखील लक्षात घेण्यासारखे आहे की डास फक्त रंगांमुळेच नाही, तर हलचाल, घामाचा वास आणि कार्बन डायऑक्साइडला प्रतिसाद देत असल्याने ते आकर्षित होण्यासाठी हे घटकही महत्त्वाचे असतात.
पांढरा, हिरवा आणि निळा हे रंग डास साधारत: टाळतात.
डासांचा धोका टाळण्यासाठी हलक्या रंगाचे कपडे आपण घालू शकतो.
याशिवाय डासांचा धोका टाळण्यासाठी आपण मॉस्किटो रेपेलंटही वापरले पाहिजे. तसेच इतर काळजीही घेतली पाहिजे.