२०२५ मध्ये कोणकोणत्या देशाचं सरकार पडून तिथे सत्तापालट झाला? जाणून घ्या यादी आणि कारण...

Mansi Khambe

२०२५ मध्ये सरकार हादरले

२०२५ हे वर्ष आता त्याच्या शेवटच्या टप्प्यांकडे येत आहे. गेले वर्ष भारत आणि जगभरातील अनेक देशांसाठी अशांत होते. राजकीय वादळांनी अनेक सरकारांना हादरवून टाकले आहे.

Government Collapse 2025 List

|

ESakal

इतिहास बदलला

निवडणुकांनी इतिहास बदलला आहे. जनतेच्या संतापामुळे सत्तेत असलेल्यांना राजीनामा द्यावा लागला आहे. भारतात, २०२५ हे वर्ष देशाच्या राजकारणाला वारंवार हादरवून टाकणारे होते.

Government Collapse 2025 List

|

ESakal

सत्तासंघर्षांचा सामना

कधी निवडणुका, कधी नवीन कायदे, कधी दहशतवादी हल्ले आणि लष्करी प्रत्युत्तर. आपल्या शेजारील देशांमध्येही अशांतता, निदर्शने आणि सत्तासंघर्षांचा सामना करावा लागला.

Government Collapse 2025 List

|

ESakal

सत्ताबदल

नेपाळ, बांगलादेश, पाकिस्तान आणि श्रीलंका सारख्या देशांमध्ये सरकार कोसळले आणि सत्ताबदल झाले. बेनिन या आफ्रिकन देशातही लष्कराने सत्ता काबीज केली.

Government Collapse 2025 List

|

ESakal

कुठे सरकारे पडली?

२०२५ मध्ये कुठे सरकारे पडली आणि कोणत्या देशांमध्ये सत्तापालट का झाला? हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Government Collapse 2025 List

|

ESakal

नेपाळ

नेपाळमधील सोशल मीडियावरील बंदीमुळे तरुणांमध्ये संताप निर्माण झाला. जनरल-झेड यांनी हा त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला मानला. पंतप्रधान केपी शर्मा ओली आणि राष्ट्रपती रामचंद्र पौडेल दोघांनाही राजीनामा द्यावा लागला.

Nepal Protest

|

ESakal

बांगलादेश

२०२४ मध्ये बांगलादेशात झालेल्या मोठ्या विद्यार्थ्यांच्या निदर्शनांनी शेख हसीना यांचे सरकार पाडले. २०२५ मध्ये अस्थिरता कायम राहिली. निवडणुकीपूर्वी अंतरिम सरकारच्या दोन वरिष्ठ सल्लागारांनी राजीनामा दिला.

bangladesh protest

|

ESakal

सीरिया

८ डिसेंबर २०२४ रोजी सीरियाचे अध्यक्ष बशर अल-असद देश सोडून पळून गेले. ही घटना सीरियाच्या आधुनिक इतिहासातील सर्वात मोठा राजकीय वळण ठरली. त्यानंतर २०२५ मध्ये अंतरिम सरकार स्थापन करण्यात आले.

syria protest

|

ESakal

पाकिस्तान

मे २०२३ मध्ये इम्रान खान यांच्या अटकेमुळे पेटलेली आग २०२५ पर्यंत भडकत राहिली. सरकारी इमारती जाळण्यात आल्या. लष्करी तळांना वेढा घातला गेला. या अशांततेमुळे राजकीय अस्थिरता निर्माण झाली.

pakistan protest

|

ESakal

श्रीलंका

२०२२ पासून श्रीलंका आर्थिक संकटात होता. जनतेच्या संतापामुळे सरकार हादरले. राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना देश सोडावा लागला. २०२५ मध्ये राजकारण अशांत राहिले. माजी नेते भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात आहेत.

srilanka protest

|

ESakal

म्यानमार

२०२१ मध्ये झालेल्या लष्करी उठावानंतर म्यानमार राजकीय हिंसाचार आणि अस्थिरतेत अडकलेला आहे. लोकशाही शक्ती अजूनही लढत आहेत. परंतु लष्कर सत्तेत आहे.

myanmar protest

|

ESakal

अफगाणिस्तान

२०२१ मध्ये अमेरिका गेल्यानंतर तालिबानने सत्ता काबीज केली. २०२५ पर्यंत तिथे लोकशाहीची आशा नाही आणि लोक दडपशाहीचा सामना करत आहेत.

Government Collapse 2025 List

|

ESakal

आफ्रिकन देश बेनिन

२०२५ मध्ये, लष्कराने बेनिनमध्ये मिलिटरी कमिटी फॉर रिफाउंडेशन या नावाने सत्ता काबीज केली. अध्यक्षांना काढून टाकण्यात आले आणि निवडणुका विस्कळीत करण्यात आल्या.

benin protest

|

ESakal

तुम्हाला फायनल आणि फिनालेमधील फरक माहित आहे का?

Final And Finale Difference

|

ESakal

येथे क्लिक करा