रशिया, चीन की अमेरिका – सर्वाधिक अणुबॉम्ब कोणाकडे? भारत-पाकिस्तान कितव्या स्थानी?

सकाळ डिजिटल टीम

कोणत्या देशांकडे अण्वस्त्रे आहेत?

Union of Concerned Scientists या संस्थेनुसार, सध्या अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स, ब्रिटन, पाकिस्तान, भारत, इस्रायल आणि उत्तर कोरियाकडे अण्वस्त्रे आहेत.

Nuclear Armed Countries

सर्वाधिक अण्वस्त्र असलेला देश कोणता?

सध्या अण्वस्त्रांच्या बाबतीत रशिया सर्वात आघाडीवर आहे. रशियाकडे सुमारे 6000 अण्वस्त्रे आहेत.

Nuclear Armed Countries

दुसऱ्या क्रमांकावर कोण?

रशियानंतर अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर आहे. Federation of American Scientists च्या माहितीनुसार, अमेरिकेकडे सुमारे 5400 अण्वस्त्रे आहेत.

Nuclear Armed Countries

तिसऱ्या स्थानावर कोण?

पेंटॅगॉनचा दावा आहे की, चीनकडे सुमारे 500 अण्वस्त्रे आहेत.

Nuclear Armed Countries

चौथ्या क्रमांकावर कोण?

फ्रान्सकडे सध्या 290 अण्वस्त्रे असून तो चौथ्या स्थानावर आहे.

Nuclear Armed Countries

पाचव्या स्थानावर कोण?

युनियन ऑफ कन्सर्न्ड सायंटिस्ट्सच्या अहवालानुसार, ब्रिटनकडे सुमारे 120 अण्वस्त्रे आहेत, त्यामुळे तो पाचव्या स्थानावर आहे.

Nuclear Armed Countries

भारत आणि पाकिस्तान कुठे आहेत?

अण्वस्त्रधारी देशांच्या यादीत भारत व पाकिस्तान यांचा समावेश आहे. भारताकडे 160 अण्वस्त्रे आहेत, तर पाकिस्तानकडे सुमारे 170 अण्वस्त्रे आहेत.

Nuclear Armed Countries

सूर्यप्रकाश नकोय? मग, Vitamin D असणारी 'ही' आयुर्वेदीय फळं खा!

Ayurvedic Vitamin D Fruit | esakal
येथे क्लिक करा