संतोष कानडे
मुंगूसाचे दर्शन शुभ की अशुभ, याबाबत वेगवेगळ्या लोकमान्यता प्रचलित आहेत.
आमूक दिवशी मुंगसाचे तोंड बघावे आणि तमूक दिवशी बघू नये, असे मेसेज सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहेत.
काही ज्योतिषीय मान्यतांमध्ये मुंगूसाला शुभ प्राणी मानले जाते. विशेषतः सकाळी मुंगूस दिसणे शुभ संकेत मानले जाते.
काही परंपरांनुसार मुंगूसाचा संबंध धन-संपत्तीशी जोडला जातो. मात्र त्याला कुठलाही वैज्ञानिक आधार नाही.
काही ठिकाणी मुंगूसाला भगवान कुबेराशी संबंधित मानले जाते. प्रवासाला जाताना मुंगूस रस्ता ओलांडल्यास ते कामासाठी शुभ संकेत असल्याची लोकश्रद्धा आहे.
मात्र विशिष्ट वार किंवा तिथीला मुंगूसाचे तोंड पाहू नये, अशी ठोस आणि सर्वमान्य परंपरा उपलब्ध पुराव्यांत दिसत नाही.
त्यामुळे “अमुक दिवशी मुंगूस पाहू नये” असे निश्चितपणे सांगणे योग्य ठरणार नाही. व्हायरल मेसेच निव्वळ निराधार आहेत.
मुंगूस हा वन्य प्राणी असून त्याचे नैसर्गिक वर्तन धार्मिक शकुनांपेक्षा वेगळ्या वैज्ञानिक कारणांवर आधारित असते.
त्यामुळे मुंगूस दिसण्याबाबतच्या शुभ-अशुभ कल्पना लोकश्रद्धा म्हणूनच मांडाव्यात; त्यांना वैज्ञानिक तथ्य समजू नये.