Saisimran Ghashi
हल्ली आपण ऐकतो की शरीरात कोलेस्टेरॉल वाढल्याच्या समस्या वाढत आहेत.
कोलेस्टेरॉल म्हणजे चरबीसारखा आणि मेणासारखा पदार्थ, जो शरीराच्या पेशींमध्ये आणि रक्तात असतो.
पण शरीरात कोलेस्टेरॉल वाढल्यास वजनवाढ, हृदयविकार, मधुमेहासह अनेक आजार वाढू लागतात.
ओट्स खाल्ल्याने कॉलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत मिळते.
जास्तीत जास्त कडधान्ये खा ज्यामुळे कॉलेस्ट्रॉल कमी होते.
कॉलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी सोयाबीन फायदेशीर ठरते.
जेवणात जास्तीत जास्त हिरव्या भाज्या खा. यामुळे कॉलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते.
कॉलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी काय खावे यासोबतच काय खावू नये हे ही लक्षात घ्या आणि व्यायाम करणे विसरू नका.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.