Saisimran Ghashi
रात्रीचे जेवण आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचे असते. हे जेवण शक्यतो चुकवू नये.
पण तुम्हाला माहिती आहे काय रात्रीच्या जेवणाचा आपल्या झोपेवर आणि आरोग्यावर परिणाम होतो.
असे काही पदार्थ आहेत जे रात्रीच्या जेवणात खाणे शक्यतो टाळावे कारण त्यामुळे अपचन आणि पोटात गॅस होतो.
ब्रोकली किंवा फ्लॉवर पचण्यास जड असते त्यामुळे रात्री खाणे टाळा. यामुळे अपचन होऊ शकते.
रात्रीच्या जेवणात राजमा खाणे शक्यतो टाळा कारण यामुळे पोटात गॅस होऊ शकतो.
रात्रीच्या जेवणात जास्त मसालेदार पदार्थ खाणे टाळावे.
वांग्यामध्येही टोमॅटोसारखं अमीनो अॅसिड असतं ज्यात टायरामाइनचं प्रमाण जास्त असतं. जे बॉडीला अॅक्टिव ठेवते. त्यामुळे रात्री वांगे खावू नका.
दह्याचेही आरोग्याला अनेक फायदे होतात. पण दही रात्री अजिबात खाऊ नये. यामुळे अपचन होते.
हे पदार्थ रात्री खाणे टाळल्यास गॅस, अपचन होत नाही आणि शांत झोप लागते.
ही केवळ सामान्य माहिती आहे. ही लक्षणे असल्यास किंवा आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.