सकाळ वृत्तसेवा
शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकानंतर स्वराज्यात स्वतंत्र नाणे चलनात आणले.
इंग्रजांनी व्यापारविषयक तहात स्वराज्यात इंग्रजी नाणी वापरण्याचा प्रस्ताव दिला.
"आमच्या राज्यात आमचेच नाणे असले पाहिजे." – शिवाजी महाराजांनी इंग्रजी नाण्यांना विरोध केला.
राज्याभिषेकानंतर रायगड येथे महाराजांनी टाकसाळ सुरू केली आणि स्वतंत्र नाणी निर्माण केली.
महाराजांच्या खजिन्यात ३२ प्रकारची सुवर्ण नाणी व ६ प्रकारची चांदीची नाणी होती.
तांब्याच्या नाण्यावर एका बाजूला "श्री शिवराज" व दुसऱ्या बाजूस "छत्रपती" कोरलेले असायचे.
हे नाणे सुमारे १५० वर्षे चलनात होते आणि त्याचे वजन १०-१२ तोळे होते.
ढबू (२ पैशाचे नाणे) देखील प्रचलित होते, ज्याचे वजन २२ मासे होते.
शिवाजी महाराजांसाठी स्वतंत्र नाणे हे स्वराज्याच्या सार्वभौमत्वाचे प्रतीक होते.