लसूण कुठल्या राज्यात सगळ्यात जास्त पिकतो? माहीत आहे का 'गार्लिक सिटी'?

सकाळ डिजिटल टीम

जेवणाची चव वाढवणारा लसूण

भारतीय स्वयंपाकघरात फोडणीपासून चटणीपर्यंत प्रत्येक पदार्थाची चव वाढवण्यासाठी लसणाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.

India's Famous Garlic City

|

sakal 

६३ टक्के लसूण

भारतात सर्वात जास्त लसणाची शेती मध्य प्रदेश राज्यात होते; जिथे देशातील एकूण लसूण उत्पादनाच्या सुमारे ६३ टक्के उत्पादन घेतले जाते.

India's Famous Garlic City

|

sakal 

भारताची 'लसूण सिटी'!

मध्य प्रदेशातील मंदसौर या शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर लसणाचे उत्पादन आणि व्यापार चालत असल्याने त्याला भारताचे 'लसूण शहर' म्हणजेच 'गार्लिक सिटी' म्हटले जाते.

India's Famous Garlic City

|

sakal 

'वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट'

शासनाच्या 'एक जिल्हा एक उत्पादन' (ODOP) उपक्रमांतर्गत मंदसौर जिल्ह्यात लसूण हे मुख्य पीक म्हणून निवडले गेले आहे.

India's Famous Garlic City

|

sakal 

तिखट चव अन् तीव्र सुवास

येथे पिकणारा लसूण त्याच्या तीव्र सुवासामुळे, उच्च दर्जाच्या पाकळ्यांमुळे आणि दीर्घकाळ टिकण्याच्या उत्कृष्ट गुणांमुळे ओळखला जातो.

India's Famous Garlic City

|

sakal 

दर्जेदार पदार्थ

मंदसौरच्या लसणापासून लसूण पावडर, लसणाचे तेल, पेस्ट, लोणचे आणि सुके फ्लेक्स यांसारखे अनेक प्रक्रिया केलेले पदार्थ तयार केले जातात.

India's Famous Garlic City

|

sakal 

उत्पन्नाचे साधन

मंदसौर आणि परिसरातील शेकडो शेतकऱ्यांसाठी लसूण हे शेतीतून नफा मिळवून देणारे उत्पन्नाचे सर्वात मोठे साधन आहे.

India's Famous Garlic City

|

sakal 

लागवड

मध्य प्रदेशाशिवाय राजस्थान, उत्तर प्रदेश आणि गुजरात या राज्यांमध्येही लसणाचे व्यावसायिक उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते.

India's Famous Garlic City

|

sakal 

आरोग्यासाठी लसूण गुणकारी

केवळ चवच नाही, तर आरोग्याच्या दृष्टीनेही फायदेशीर असलेल्या लसणात अनेक महत्त्वपूर्ण पौष्टिक घटक भरपूर प्रमाणात असतात.

India's Famous Garlic City

|

sakal

औरंगजेबाच्या 'या' राणीसाठी १६६० मध्ये ताजमहालासारखाच महाल कोणी बांधला होता?

History Behind the Taj of the Deccan

|

sakal

आणखी वाचा