सकाळ डिजिटल टीम
मेंदू शरीराचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे आणि त्याचे आरोग्य चांगले ठेवणे आवश्यक आहे. अक्रोड आणि बदाम यांचा मेंदूच्या आरोग्यावर चांगला प्रभाव आहे.
अक्रोडला "ब्रेन फूड" म्हंटले जाते कारण यामध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड्स असतात. हे न्यूरॉन्स मजबूत करतात आणि मेंदूची स्मरणशक्ती वाढवतात.
अक्रोड नियमितपणे खाल्ल्याने डिमेंशिया आणि अल्झायमर सारख्या आजारांचा धोका कमी होतो.
बदामांमध्ये व्हिटॅमिन ई, अँटीऑक्सिडंट्स आणि हेल्दी फॅट्स असतात, जे मेंदूला सक्रिय ठेवतात. भिजवलेले बदाम स्मरणशक्ती सुधारतात.
ओमेगा-३ फॅटी ॲसिड्समुळे अक्रोड अधिक स्मरणशक्तीसाठी प्रभावी ठरते. ते मेंदूसाठी जास्त फायदेशीर आहे.
सकाळी ४-५ भिजवलेले बदाम आणि २-३ अक्रोड खा. यामुळे एकाग्रता आणि मानसिक शांती मिळते.
अक्रोड आणि बदाम दोन्हीचे सेवन एकाच वेळी केल्याने अधिक फायदा होतो.
कोणत्याही आरोग्य समस्यांसाठी आहारात बदल करताना डॉक्टरांचा सल्ला घ्या.