उन्हाळ्यात शरीराला थंडावा हवाय? मग सब्जाचे पाणी प्यावे की चिया सीड्सचे?

Aarti Badade

उन्हाळ्यातील 'सुपरफूड्स'

उन्हाळ्यात शरीर हायड्रेटेड आणि थंड ठेवणे आव्हानात्मक असते. अशा वेळी चिया सीड्स आणि सब्जा बी हे दोन उत्तम पर्याय समोर येतात, पण दोघांचे गुणधर्म वेगळे आहेत.

Sabja vs Chia seeds benefits in summer

|

Sakal

चिया बी

चिया बी प्रामुख्याने पांढऱ्या, काळ्या आणि राखाडी रंगात असतात. यात ओमेगा-३ फॅटी ॲसिड्स आणि कॅल्शियमचे प्रमाण भरपूर असते, जे हृदयासाठी आणि हाडांसाठी फायदेशीर आहे.

Sabja vs Chia seeds benefits in summer

|

Sakal

सब्जा बी

सब्जा बी गडद काळ्या रंगाच्या असतात. या बियांची तासीर (गुणधर्म) अतिशय थंड असते. भारतासारख्या उष्ण हवामानातील देशात शरीराची उष्णता कमी करण्यासाठी हे सर्वोत्तम मानले जाते.

Sabja vs Chia seeds benefits in summer

|

Sakal

पोषणातील फरक

चिया : प्रथिने आणि निरोगी चरबीसाठी उत्तम. रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करते.सब्जा : फायबरचे प्रमाण जास्त (७ ग्रॅम) असते. ॲसिडिटी कमी आणि पचन सुधारण्यासाठी गुणकारी आहे.

Sabja vs Chia seeds benefits in summer

|

Sakal

वजन कमी करण्यासाठी

सब्जा बी पाण्यामध्ये लवकर फुगतात आणि त्यामुळे पोट जास्त वेळ भरलेले राहते. भूक कमी लागल्यामुळे वजन कमी करण्याच्या प्रवासात सब्जा अधिक प्रभावी ठरतो.

Sabja vs Chia seeds benefits in summer

|

Sakal

खाण्याची योग्य पद्धत

चिया स्मूदी, पुडिंग किंवा सॅलडमध्ये कच्चे किंवा भिजवून खाऊ शकता. सब्जा नेहमी भिजवूनच खावा. लिंबू पाणी, सरबत, फालुदा किंवा दह्यात घालून याचे सेवन करणे फायदेशीर ठरते.

Sabja vs Chia seeds benefits in summer

|

Sakal

उन्हाळ्यासाठी काय निवडावे?

जर तुम्हाला शरीरातील उष्णता कमी करायची असेल आणि हायड्रेशन हवे असेल, तर सब्जा हा उन्हाळ्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. मात्र, पोषणासाठी चिया सीड्सचा आहारात समावेश करा.

Sabja vs Chia seeds benefits in summer

|

Sakal

उन्हाळा असो वा पावसाळा; पुण्याजवळच्या 'या' 5 थंड हवेच्या ठिकाणांना नक्की भेट द्या!

Best hill stations near Pune

|

Sakal

येथे क्लिक करा