सकाळ वृत्तसेवा
पुण्यातील बाणेरमध्ये वसलेलं ९०० वर्षांहून जुने सोमेश्वर मंदिर. हे मंदिर आपली संस्कृती आजही जपत आहे.
आज जरी ही नदी ‘नाला’ म्हणून ओळखली जाते, तरी त्या काळी राम नदीच्या काठावरच हे मंदिर उठून दिसायचं.
या मंदिराचं दगडी बांधकाम आणि बारीक नक्षीकाम यामुळे ते एक अद्भुत शिल्पकलेचा नमुना ठरतं.
मंदिराच्या परिसरात गणपती, हनुमान आणि भैरवनाथांची लहान पण पुरातन मंदिरं आहेत.
प्रवेशद्वारावर ४० फूट उंच दीपमाळ आहे, तर मंदिराच्या उत्तरेला हवनकुंड दिसतं – धार्मिकतेचं प्रतीक!
दगडी तटबंदीने वेढलेलं हे मंदिर एका छोट्या गॅलरीसह सजलेलं आहे, जिथे मोडी लिपीतील दस्तऐवज आणि जुनी चित्रं आहेत.
ऐतिहासिक आख्यायिकेनुसार, लाल महालात वास्तव्यास असताना राजमाता जिजाऊ आऊसाहेब या मंदिरात नेहमी दर्शनासाठी येत असत.
शिवराम भट चित्रव स्वामींना येथे सोन्याचे नाणे सापडले होते – जो खजिना त्यांनी नानासाहेब पेशव्यांना दान केला होता.
त्या खजिन्याचा उपयोग मंदिराच्या नूतनीकरणासाठी करण्यात आला – पेशव्यांनीही या धार्मिक जागेचं महत्त्व जपलं.