Anushka Tapshalkar
प्रत्येक घरात उपलब्ध असणारी हळद औषधी आणि आयुर्वेददृष्ट्या अनेक आजारांवर एक उत्तम व प्रभावी उपाय आहे.
हळदीत कर्क्यूमिन असते व ती तिच्या अँटिऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मांसाठी ओळखली जाते.
दिवसाठून १-३ ग्राम किंवा अर्धा ते एक चमचा हळद दररोज खाणे चांगले असते.
हळदीची पावडर उकळत्या पाण्यात मिसळून तयार केलेले हे पेय सकाळी उपाशीपोटी घेतल्यास शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते.
हळदीचे पाणी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास, पचन सुधारण्यास, जळजळ कमी करण्यास व यकृत शुद्धीकरणासाठी मदत करते.
गरम दुधात हळदीची पावडर मिसळून तयार केलेले हे पेय झोपण्यापूर्वी घेतल्यास आरोग्यासाठी उपयुक्त असते.
हळदीचे दूध प्यायल्याने झोपेची गुणवत्ता सुधारण्यास, मेंदूचे आरोग्य वाढवण्यास आणि रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करते.
हळदीचे पाणी सकाळी उपाशी पोटी आणि हळदीचे दूध रात्री झोपण्यापूर्वी घ्यावे.
दोन्ही, हळदीचे पाणी आणि हळदीचे दूध हे त्यांच्या स्वतंत्र गुणधर्मांसाठी फायदेशीर आहेत. त्यांचे सेवन केल्यास आरोग्याचे अनेकी फायदे होतात.