जगातील सर्वात महागडी क्रिकेट बॅट कोणती? किंम्मत जाणून व्हाल थक्क...

Mansi Khambe

अमूल्य खजिना

ऐतिहासिक डाव खेळण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या क्रिकेट खेळाडूच्या बॅट, कालांतराने क्रिकेट चाहत्यांसाठी अमूल्य खजिना बनतात.

Expensive Cricket Bat

|

ESakal

बॅटचा लिलाव

म्हणूनच जेव्हा अशा बॅटचा लिलाव केला जातो तेव्हा त्यांची किंमत लाखोंपर्यंत पोहोचू शकते. क्रिकेट इतिहासातही अशाच काही बॅट पाहिल्या आहेत ज्या विक्रमी किमतीत विकल्या गेल्या आहेत.

Expensive Cricket Bat

|

ESakal

सर्वात महागडी क्रिकेट बॅट

जागतिक चर्चेचा विषय बनल्या आहेत. तर, आज आपण तुम्हाला सांगणार आहोत की जगातील सर्वात महागडी क्रिकेट बॅट कोणती आहे आणि कोणता क्रिकेटपटू त्याच्याशी संबंधित आहे.

Expensive Cricket Bat

|

ESakal

सर डॉन ब्रॅडमन

जगातील सर्वात महागडी क्रिकेट बॅट ऑस्ट्रेलियाचे दिग्गज फलंदाज सर डॉन ब्रॅडमन यांच्याशी संबंधित आहे. या बॅटची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद आहे.

Expensive Cricket Bat

|

ESakal

क्रिकेट बॅट

या बॅटशी संबंधित इतिहास आणि ब्रॅडमनची चमकदार फलंदाजी याला खूप खास बनवते. डॉन ब्रॅडमन यांच्याकडे अनेक क्रिकेट बॅट असल्या तरी ही बॅट सर्वाधिक चर्चेत राहिली आहे.

Expensive Cricket Bat

|

ESakal

खरेदी

२०२१ मध्ये या खास बॅटचा लिलाव करण्यात आला होता. लिलावादरम्यान एका व्यक्तीने नाव न सांगण्याच्या अटीवर ते खरेदी केले.

Expensive Cricket Bat

|

ESakal

किंम्मत

ही बॅट २४५,००० ऑस्ट्रेलियन डॉलर्स किंवा अंदाजे १.९ ते २ कोटी रुपयांना विकली गेली. ज्यामुळे ती जगातील सर्वात महागडी क्रिकेट बॅट बनली.

Expensive Cricket Bat

|

ESakal

अ‍ॅशेस कसोटी मालिका

जगातील सर्वात महागडी बॅट तीच होती जी सर डॉन ब्रॅडमन यांनी १९३४ च्या अ‍ॅशेस कसोटी मालिकेत वापरली होती. याच बॅटने त्यांनी इंग्लंडविरुद्ध संस्मरणीय डाव खेळले.

Expensive Cricket Bat

|

ESakal

ओव्हल कसोटी

हेडिंग्ले कसोटीत त्यांनी ३०४ धावा आणि ओव्हल कसोटीत २४४ धावा केल्या. शिवाय, ब्रॅडमन यांनी स्वतः या दोन्ही डावांची माहिती बॅटवर कोरली. ज्यामुळे त्याचे ऐतिहासिक महत्त्व आणखी वाढले.

Expensive Cricket Bat

|

ESakal

बाउरल

डॉन ब्रॅडमनची बॅट खरेदी करणाऱ्या व्यक्तीने ती स्वतःसाठी ठेवली नाही, तर ती ऑस्ट्रेलियातील बाउरल येथील डॉन ब्रॅडमन संग्रहालयात प्रदर्शनासाठी दान केली.

Expensive Cricket Bat

|

ESakal

जगातील पहिली नोट कोणत्या देशात बनवली गेली? ती कोणी आणि कशी सुरू केली? जाणून घ्या...

world's first banknote History

|

ESakal

येथे क्लिक करा