चहाचा हिंदी शब्द 'चाय' नाही? कुठून आलं चहाचं नाव?

अंकिता खाणे (Ankita Khane)

जगभरात चहाप्रेमींची कमतरता नाही. काही लोक चहाचे इतके वेडे असतात की ते एका दिवसात कितीही कप चहा पिऊ शकतात.

भारतात चहा आणण्याचे श्रेय ब्रिटीशांना जाते, पण तो भारतीयांच्या जीवनशैलीत इतका रुजलेला आहे की तो दिवसाच्या सुरवातीचा एक घटक बनला.

भारतातील शहरे आणि खेड्यापाड्यात प्रसिद्ध असलेला चहा हा शब्द कोणत्या भाषेतून आला आहे, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?

हिंदी भाषेत असे अनेक शब्द आहेत ज्यांच्याबद्दल आपल्याला माहित नाही की ते इतर भाषांमधून घेतले गेले आहेत. यामध्ये काही वस्तू आणि काही खाद्यपदार्थांचा समावेश होतो, ज्यांचा आपण वापर करतो.

असा एक शब्द आहे - चहा, ज्याच्या उत्पत्तीबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे.

चहाचा शोध भारतातच लागला असे बहुतेकांना वाटते. 'चाय' आणि 'चहा' हे दोनच शब्द या खास पेयाची व्याख्या करतात. हे दोन्ही शब्द एकाच भाषेतून आले आहेत, जे जगभरात वापरले जात होते.

आता प्रश्न असा आहे की हा शब्द नेमका कोणत्या भाषेत आहे? हा मूलतः चीनमध्ये बोलल्या जाणाऱ्या मंदारिन भाषेतील शब्द आहे.

याला चीनमध्ये "चा (茶)" म्हणतात. कोरिया आणि जपानमध्येही असेच म्हटले गेले आणि जिथे जिथे हा शब्द पोहोचला तिथे त्याला चहा म्हटले गेले.

विशेष म्हणजे 'टी' हा इंग्रजी शब्दही चीनमधून आला आहे. मिन नान भाषा चीनच्या एका प्रदेशात बोलली जाते, जिथे '茶' चा उच्चार 'te' होतो. येथे व्यवसायासाठी येणारे लोक याला टी म्हणू लागले.

आता याला हिंदीत काय म्हणतात? तर याचं उत्तर असं आहे की चहाला हिंदीत ‘दुध आणि पाण्यात साखर मिसळलेली पर्वतीय वनस्पती’ म्हणतात. त्याला संस्कृत हिंदीत उष्णोदक असेही म्हणतात.

आता याला हिंदीत काय म्हणतात? तर याचं उत्तर असं आहे की चहाला हिंदीत ‘दुध आणि पाण्यात साखर मिसळलेली पर्वतीय वनस्पती’ म्हणतात. त्याला संस्कृत हिंदीत उष्णोदक असेही म्हणतात.

वारंवार उकळ्याने चहाचं होऊ शकतं विष; हिवाळ्यात घ्या विशेष काळजी