Shubham Banubakode
मुघल काळात भारत श्रीमंत देश होता. मुघल बादशहांकडे प्रचंड संपत्ती होती. त्यामुळेच भारताला "सोने की चिडीया " म्हटलं जायचं.
मुघल बादशहांपैकी अकबर सर्वात श्रीमंत बादशहा होता. त्याच्याकडे इतकी संपत्ती होती, त्याचा अंदाजा लावणंही कठीण आहे.
आर्थिक इतिहासकार एंगस मॅडिसन यांच्या मते, अकबराची विलासी जीवनशैली युरोपलाही लाजवणारी होती.
अकबराच्या काळात मुघल साम्राज्य इतकं विशाल होतं की जगाच्या तुलनेत भारताची जीडीपी २४ टक्के होती, असं मानलं जातं.
अकबराचा कार्यकाळ १५४२ ते १६०५ पर्यंत होता. तो मुघल साम्राज्याचा तिसरा बादशहा होता. त्याच्या मृत्यूनंतर जहांगीर आणि शाहजहान यांनी सर्व संपत्ती उधळली.Which Mughal Emperor Had the Most Wealth
अकबराच्या काळात सुव्यवस्थित कर-प्रशासन प्रणाली होती. ज्यामुळे त्याला प्रचंड संपत्ती जमा करता आली.
अकबराच्या मृत्यूनंतर जहांगीर आणि शाहजहान यांनी त्याच्या संपत्तीचा मोठा भाग खर्च केला. पण तरीही मुघल साम्राज्याची श्रीमंती कायम होती.
याशिवाय हैदराबादचा शेवटचा निजाम हा इतिहासातील सर्वात श्रीमंत बादशहांपैकी एक मानला जातो, ज्याची संपत्ती अलीकडेच चर्चेत होती.
हैदराबादच्या निजामाची संपत्ती काही वर्षांपूर्वी २३० अब्ज डॉलर्स इतकी मोजण्यात आली होती.
मुघल काळापासून ते निजामापर्यंत, भारताला "सोने की चिडीया" म्हटलं जायचं.