Saisimran Ghashi
आज सरकारी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर पेन्शन मिळते, पण इतिहासात मुघल सम्राटांनाही इंग्रजांनी पेन्शन देण्यास सुरुवात केली होती. हे ऐकून कोणालाही आश्चर्य वाटेल.
१७६५ मध्ये झालेल्या अलाहाबाद करारानंतर इंग्रज आणि मुघल यांच्यात एक वेगळीच संधी निर्माण झाली. ब्रिटिशांनी दिल्लीच्या गादीवर बसलेल्या मुघल सम्राटाला अधिकृतपणे पेन्शन देण्यास मान्यता दिली.
शाह आलम दुसरा हा पहिला मुघल सम्राट होता ज्याला इंग्रजांकडून अधिकृत पेन्शन मिळू लागली. इतकंच नव्हे तर त्याला मिळणारी रक्कम होती तब्बल २६ लाख रुपये,जे त्या काळात एक विक्रमी आकडा होता.
इतिहासकार सांगतात की शाह आलमने ब्रिटीश सैन्यासाठी लाल किल्ल्याचे दरवाजे उघडले होते. इंग्रज त्याच्यावर अत्यंत खुश होते आणि कदाचित यामुळेच त्याला इतकी मोठी पेन्शन देण्यात आली.
शाह आलम दुसऱ्यानंतर मुघल साम्राज्याचा प्रभाव कमी होऊ लागला आणि त्यासोबतच इंग्रजांचं मुघलांवरील प्रेमही कमी झालं. परिणामी, पेन्शनची रक्कमही झपाट्याने घटली.
शेवटचा मुघल सम्राट बहादुर शाह जफर याला फक्त १ लाख रुपये दरमहा पेन्शन मिळत होती. मुघल साम्राज्याच्या वैभवाच्या तुलनेत ही रक्कम अत्यंत तुटपुंजी मानली जाते.
ही संपूर्ण घटना म्हणजे भारतीय उपखंडातील राजकीय बदलांचा एक वेगळाच पैलू दाखवते. ‘राजेही पेन्शनवर जगले’ हे उदाहरण मुघल काळाच्या अखेरची चपखल आठवण आहे.