सापांना कोणत्या वासांचा त्रास होतो?

संतोष कानडे

तीव्र वास

सापांना काही तीव्र वास अप्रिय वाटतात. त्यामुळे त्या वासांपासून ते तसे दूरच जाणं पसंत करतात.

तीव्र सुगंधी पदार्थ

लसूण, कांदा, मिरची किंवा काही तीव्र सुगंधी पदार्थ सापांना त्रासदायक वाटतात, असा घरगुती समज आहे.

दालचिनी

दालचिनी, लवंग, पुदिना आणि काही आवश्यक तेलांबाबतही साप दूर राहतात असे दावे केले जातात.

परिसर

मात्र अशा पदार्थांचा वापर केल्याने साप नक्कीच परिसर सोडून जातील, असे मानणे योग्य नाही.

अवयव

वास ओळखण्यासाठी साप त्यांच्या जिभेचा आणि जेकबसन अवयवाचा वापर करतात.

रासायनिक संकेत

त्यामुळे वातावरणातील रासायनिक संकेत त्यांच्यासाठी महत्त्वाचे असतात.

केरोसीन

पेट्रोल, केरोसीन, फिनाइल किंवा इतर रसायने वापरून साप पळवण्याचा प्रयत्न करू नये.

पाळीव प्राणी

अशा रसायनांमुळे माणसे, पाळीव प्राणी आणि पर्यावरणालाही धोका निर्माण होऊ शकतो.

झुडपे

घराजवळ साप येऊ नयेत यासाठी परिसरातील झुडपे, कचरा आणि लपण्याची ठिकाणे कमी ठेवणे अधिक उपयुक्त ठरते.

सर्पमित्र

साप घरात आल्यास त्याला पकडण्याचा प्रयत्न न करता स्थानिक सर्पमित्र किंवा प्रशिक्षित बचाव पथकाची मदत घेणे सुरक्षित ठरते.

मुघल बादशहांच्या जेवणात रोज थोडं-थोडं विष का दिलं जाई?

<strong>येथे क्लिक करा</strong>