सकाळ वृत्तसेवा
गौतम अदानी हे फोर्ब्सच्या यादीतील एक मोठे उद्योगपती आहेत.
१ जानेवारी १९९८ रोजी गौतम अदानी आणि शांतीलाल पटेल यांचे अपहरण झाले. मोहम्मदपुरा येथे त्यांना खंडणीसाठी उचलण्यात आले.
कारसमोर स्कूटर उभी करून गाडी थांबवली. काही लोकांनी दोघांना गाडीतून बाहेर काढले आणि त्यांना घेऊन गेले.
सरखेज पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला गेला. ९ लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
अपहरणकर्त्यांनी दोघांना एका अनोळखी ठिकाणी नेले. काही काळ ते कुठे आहेत हे कळले नाही.
या घटनेमागे कुप्रसिद्ध गुन्हेगार फजल-उर-रहमान उर्फ फजलू याचा हात होता, असे तपासात समोर आले.
फजलू हा बिहारचा होता. तो एकेकाळी दाऊद इब्राहिमचा प्रतिस्पर्धी डॉन मानला जात होता.
अदानींना सोडवण्यासाठी अपहरणकर्त्यांनी १५ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याची चर्चा होती.
लंडनच्या फायनान्शिअल टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत अदानी म्हणाले: "माझ्या आयुष्यात २-३ वाईट घटना घडल्या... त्यातील ही एक होती."