Shubham Banubakode
जभगरात दारुचे व्हिस्की, वोडका, वाईन, रम, बियर...असे अनेक प्रकार बघायला मिळतात, प्रत्येकाची चव आणि बनवण्याची पद्धत वेगळी असते.
व्हिस्की भारतात खूपच लोकप्रिय. गहू आणि जौ यांचे फर्मेंटेशन करून ती बनवली जाते. यात ३० ते ६५% अल्कोहोल असते. प्रत्येक ब्रँडची खासियत वेगळी असते.
रम थंड वातावरणात सेवन केली जाते. ऊसाच्या रसापासून फर्मेंटेशन करून रम बनवली जाते. यात ४०% अल्कोहोल, तर ओव्हरप्रूफ रममध्ये ६०-७०% अल्कोहोल असते.
रेड वाईनला ‘फर्मेंटेड ग्रेप ज्यूस’ म्हणतात. लाल आणि काळ्या अंगूरांचे फर्मेंटेशन करून, ओक बॅरलमध्ये ठेवून बनवली जाते. यात १४% पर्यंत अल्कोहोल असतं.
वोडका तरुणांमध्ये लोकप्रिय आहे. बटाट्याच्या स्टार्चपासून फर्मेंटेशन आणि डिस्टिलेशन करून वोडका बनवला जातो. यात ४० ते ६०% अल्कोहोल असतो.
बियरमध्ये ४ ते ८% अल्कोहोल असते. फळे आणि साबुत धान्याच्या रसापासून बियर बनवली जाते. मेसोपोटामियात बियरची सुरुवात झाली.