सोनेरी नाही पांढर मधही असतं; पण आरोग्यासाठी किती फायदेशीर?

Anushka Tapshalkar

व्हाईट हनी म्हणजे काय?

व्हाईट हनी हा मधाचा एक दुर्मिळ प्रकार असून त्याचा रंग पांढुरका, पोत क्रीमी आणि चव सौम्य गोड असते. पारंपरिक सोनेरी मधापेक्षा तो दिसायला आणि चवीला वेगळा असतो.

रंग आणि पोतात फरक कशामुळे?

सामान्य मध द्रवरूप व सोनेरी असतो, तर व्हाईट हनी जवळजवळ क्रिस्टलाइज झाल्यासारखा दिसतो. यामुळेच त्याला नैसर्गिक पांढरा रंग मिळतो.

कोणत्या फुलांपासून मिळतो व्हाईट हनी?

सेज, फायरवीड आणि हवाईमधील कियावे झाडाच्या फुलांपासून व्हाईट हनी मिळतो. या दुर्मिळ फुलांमुळे त्याचा पोषणमूल्यांनी भरलेला घटक तयार होतो.

Sakal

कमी प्रक्रिया = जास्त पोषण

व्हाईट हनीवर फारशी प्रक्रिया केली जात नाही. त्यामुळे त्यातील नैसर्गिक एन्झाइम्स, अँटिऑक्सिडंट्स आणि पोषक घटक जास्त प्रमाणात टिकून राहतात.

Honey benefits in Winter

|

Sakal

अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध

व्हाईट हनीमध्ये पॉलीफेनॉल्स आणि फ्लेव्होनॉईड्स असतात, जे शरीरातील फ्री रॅडिकल्स कमी करून रोगप्रतिकारशक्ती मजबूत करतात.

Antioxidant | Sakal

संसर्ग रोखण्यास मदत

या मधामध्ये नैसर्गिक अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. घसा खवखवणे, जखमा लवकर भरून येणे आणि त्वचेची निगा राखण्यासाठी तो उपयुक्त ठरतो.

infection

पचन आणि हृदयासाठी फायदेशीर

व्हाईट हनी पचन सुधारण्यास मदत करतो, अॅसिडिटी कमी करतो आणि रक्तदाब व कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवून हृदयाच्या आरोग्यास आधार देतो.

sakal

दूधापेक्षाही जास्त कॅल्शियम असतं तीळात; खाण्याचे फायदे एकदा वाचाच

Sesame Seeds Have More Calcium than Milk

|

sakal

आणखी वाचा