संतोष कानडे
वैज्ञानिकांना भूगर्भात नैसर्गिकरीत्या तयार होणाऱ्या 'व्हाईट हायड्रोजन'चा मोठा साठा सापडला आहे.
हा हायड्रोजन प्राचीन खडक आणि पाण्याच्या रासायनिक प्रक्रियेतून तयार होत असल्याचे मानले जाते.
विशेष म्हणजे हा गॅस निसर्गात सतत तयार होत राहू शकतो, त्यामुळे तो जवळपास अमर्याद ऊर्जास्रोत मानला जातो.
कॅनडा, फ्रान्स, आफ्रिका आणि अमेरिकेत अशा साठ्यांवर संशोधन सुरू आहे.
व्हाईट हायड्रोजन जाळल्यावर धूर किंवा कार्बन डायऑक्साइड जवळपास तयार होत नाही.
त्यामुळे भविष्यात हे इंधन पेट्रोल आणि डिझेलला हा पर्याय सर्वोत्तम ठरू शकते.
वैज्ञानिकांच्या मते, हा स्वच्छ आणि पर्यावरणपूरक ऊर्जेचा मोठा खजिना ठरू शकतो.
मात्र हा गॅस मोठ्या प्रमाणावर सुरक्षितरीत्या बाहेर काढणे अजूनही आव्हानात्मक आहे.