White Jamun Benefits : काळ्या जांभळाचा 'पांढरा भाऊ' माहिती आहे का? आरोग्यासाठी ठरतोय वरदान

बाळकृष्ण मधाळे

जांभळाची आंबट-गोड चव

उन्हाळा सुरू होताच बाजारात काळ्या जांभळाची रेलचेल दिसू लागते. त्याची आंबट-गोड चव आणि आरोग्यदायी गुणधर्म सर्वांनाच परिचित आहेत.

What are the benefits of white jamun?

|

esakal

पांढऱ्या जांभळाचे आरोग्यदायी फायदे

मात्र, काळ्या जांभळाप्रमाणेच एक दुसरे फळही उपलब्ध असते, ज्याला पांढरा जांभूळ म्हणून ओळखले जाते. अनेकांना या फळाची माहिती नसली तरी त्याचे आरोग्यदायी फायदे खूप आहेत.

What are the benefits of white jamun?

|

esakal

आणखी कोणत्या नावाने ओळखले जाते?

पांढऱ्या जांभळाला वॅक्स अ‍ॅपल, जावा अ‍ॅपल, रोझ अ‍ॅपल अशा विविध नावांनीही ओळखले जाते. हे फळ उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यासोबतच त्वचा आणि आरोग्यासाठीही अत्यंत लाभदायक मानले जाते.

What are the benefits of white jamun?

|

esakal

1. पचनसंस्था निरोगी ठेवते

पांढऱ्या जांभळामध्ये पाण्याचे प्रमाण भरपूर असते. त्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. पोट फुगणे, बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या कमी होतात. तसेच इरिटेबल बोवेल सिंड्रोम (IBS) च्या लक्षणांपासूनही काही प्रमाणात आराम मिळू शकतो.

What are the benefits of white jamun?

|

esakal

2. डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त

या फळात व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात आढळते. त्यामुळे डोळ्यांवरील ताण कमी होतो आणि दृष्टी चांगली राहण्यास मदत होते. डोळे हायड्रेटेड राहिल्याने त्यांचे आरोग्य सुधारते तसेच मोतीबिंदूचा धोका कमी होण्यास मदत मिळू शकते.

What are the benefits of white jamun?

|

esakal

3. रोगप्रतिकारक शक्ती वाढवते

पांढरा जांभूळ हा व्हिटॅमिन सीचा उत्तम स्रोत आहे. यातील अँटिऑक्सिडंट्स शरीराला फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण देतात आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतात.

What are the benefits of white jamun?

|

esakal

4. मधुमेह नियंत्रणासाठी फायदेशीर

मधुमेहाच्या रुग्णांसाठी पांढरा जांभूळ उपयुक्त मानला जातो. हे फळ रक्तातील साखरेची पातळी संतुलित ठेवण्यास मदत करू शकते.

What are the benefits of white jamun?

|

esakal

5. शरीराला ठेवते हायड्रेट

पांढऱ्या जांभळामध्ये सुमारे ९३ टक्के पाणी असते. त्यामुळे उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघते. उष्माघात आणि निर्जलीकरणाचा धोका कमी करण्यासही हे फळ मदत करते.

What are the benefits of white jamun?

|

esakal

6. वजन कमी करण्यास मदत

या फळात कॅलरीचे प्रमाण कमी आणि फायबरचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे दीर्घकाळ पोट भरल्यासारखे वाटते आणि जास्त खाण्याची इच्छा कमी होते. परिणामी वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळते.

What are the benefits of white jamun?

|

esakal

7. त्वचेचे सौंदर्य वाढवते

पांढऱ्या जांभळामधील व्हिटॅमिन सी त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. हे त्वचेचा पोत सुधारण्यास, त्वचा तजेलदार ठेवण्यास तसेच बारीक रेषा आणि सुरकुत्या कमी करण्यास मदत करते.

What are the benefits of white jamun?

|

esakal

Health Benefits of Mango : दिवसातून एक आंबा खा अन् 'या' 5 गंभीर आजारांपासून दूर राहा; हृदयाच्या आरोग्यासाठीही आहे गुणकारी!

mango nutrition facts and benefits

|

esakal

येथे क्लिक करा...