White Pumpkin Benefits : वजन कमी करायचंय? मग, दररोज खा पांढरा भोपळा; शरीरात होतील 'हे' अद्भुत बदल

सकाळ डिजिटल टीम

पांढऱ्या भोपळ्याचे आरोग्यदायी फायदे

पांढरा भोपळा (पेठा) केवळ वजन कमी करण्यास मदत करत नाही, तर रोगप्रतिकारक शक्तीही मजबूत करतो. अनेक पोषक घटकांनी भरलेला हा भोपळा आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. चला तर मग, त्याचे फायदे जाणून घेऊया..

White Pumpkin Benefits

पोषणमूल्यांनी परिपूर्ण

पांढऱ्या भोपळ्यात कॅलरीज कमी आणि पोषक घटक भरपूर प्रमाणात असतात. त्यामध्ये व्हिटॅमिन A, C, E, B6, तसेच मॅग्नेशियम, फॉस्फरस, फोलेट, लोह, थायामिन आणि ल्युटीन भरपूर प्रमाणात असते. हे सर्व घटक एकत्र येऊन शरीराच्या एकूण आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतात.

pumpkin seeds benefits | Sakal

वजन कमी करण्यास मदत

जर तुम्ही पांढऱ्या भोपळ्याचा रस नाश्त्यासोबत घेतला, तर ते पोट जास्त वेळ भरलेले ठेवते आणि कॅलरीज कमी असल्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. वजन कमी करण्याचा विचार करत असाल, तर हा रस तुमच्या आहारात नक्की समाविष्ट करा.

White Pumpkin Benefits

शरीरातील विषारी घटक बाहेर टाकतो

पांढऱ्या भोपळ्यात अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे सकाळच्या वेळी याचा रस प्यायल्याने शरीर डिटॉक्स होते. हे विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते आणि त्वचेवरही चांगला परिणाम दिसून येतो.

White Pumpkin Benefits

शरीराला हायड्रेट ठेवतो

पांढऱ्या भोपळ्याच्या रसामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने तो शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करतो. तसेच, याचे थंड स्वरूप असल्यामुळे शरीरात थंडावा टिकून राहतो, विशेषतः उन्हाळ्यात हे फार फायदेशीर ठरते.

White Pumpkin Benefits

रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो

पांढऱ्या भोपळ्यामध्ये असलेले व्हिटॅमिन C, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस हे घटक रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतात. त्यामुळे हंगामी संसर्गांपासून बचाव होतो आणि एकूणच आरोग्य सुधारते.

White Pumpkin Benefits

पचनसंस्थेसाठी लाभदायक

पांढऱ्या भोपळ्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. दररोज त्याचा रस किंवा भाजी सेवन केल्यास पचनसंस्था सुधारते आणि पोटातील चांगले बॅक्टेरिया वाढीस लागतात. त्यामुळे अजीर्ण, गॅस यांसारख्या समस्या दूर राहतात.

White Pumpkin Benefits

Jackfruit Benefits : शाकाहारी आहारात 'या' फळाचा करा समावेश, मांसाहारही विसराल!

Jackfruit Benefits | esakal
येथे क्लिक करा