सकाळ डिजिटल टीम
पांढरे तिळ आरोग्यासाठी फायदेशीर का मानले जातात. यात कोण-कोणती पोषक तत्वे अढळतात जाणून घ्या.
पांढरी तीळ कॅल्शियमचा एक उत्कृष्ट स्रोत आहेत. १०० ग्रॅम तिळात सुमारे ९७५ मिलीग्राम कॅल्शियम असते. यामुळे हाडे आणि दात मजबूत होण्यास मदत मिळते.
पांढरी तीळ प्रथिनेयुक्त असतात, जे स्नायूंच्या वाढीसाठी आणि दुरुस्तीसाठी महत्त्वाचे असतात. शाकाहारी लोकांसाठी हे प्रथिनांचा एक चांगला पर्याय ठरू शकतात.
यात भरपूर प्रमाणात फायबर असल्याने पचनसंस्था निरोगी राहते. बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी आणि पोटाचे आरोग्य सुधारण्यासाठी तीळ उपयुक्त ठरू शकतात.
तिळामध्ये मोनोअनसॅच्युरेटेड आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्स असतात. हे शरीरासाठी आवश्यक असलेले चांगले फॅट्स आहेत. हे हृदयाचे आरोग्य सुधारण्यास आणि कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.
तिळात झिंक खनिज असते, जे रोगप्रतिकारशक्ती (Immunity) वाढवण्यासाठी आणि शरीराला संसर्गापासून वाचवण्यासाठी मदत करते.
तिळात सेसामिन (Sesamin) आणि सेसामोल (Sesamol) सारखे शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स असतात. हे पेशींचे संरक्षण करतात आणि शरीराला फ्री रॅडिकल्सच्या नुकसानीपासून वाचवण्यासाठी फायदेशीर मानले जातात.
व्हिटॅमिन ई हे त्वचेच्या आणि केसांच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. तिळाच्या सेवनाने त्वचा चमकदार होते आणि केस मजबूत होण्यास मदत मिळते.
हिवाळ्यात तीळ खाल्ल्याने शरीराला नैसर्गिकरित्या उष्णता आणि ऊर्जा मिळते. त्यामुळे थंडीच्या दिवसांत आळस आणि थकवा दूर होण्यास मदत होते.