छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करणारे गागाभट्ट! त्यांच्या सध्याच्या पिढीचे वंशज कोण आणि काय करतात?

Saisimran Ghashi

राज्याभिषेकाचे पौरोहित्य

सन १६७४ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक राज्याभिषेक सोहळ्याचे मुख्य पौरोहित्य पैठणच्या गागाभट्टांनी केले होते.

Gaga bhatt Role in the Coronation

|

esakal

कावळे घराणे

पैठण येथील 'कावळे' हे कुटुंब गागाभट्टांचे थेट वंशज असून ते आजही पैठणमध्ये वास्तव्यास आहेत.

Gaga bhatt connection Kawale Family

|

esakal

दक्षिण काशीचा खजिना

देशाची 'दक्षिण काशी' समजल्या जाणाऱ्या पैठणमधील कावळे गल्लीत या कुटुंबाकडे शिवकालीन अनमोल ऐतिहासिक ठेवा जतन आहे.

Treasure of Southern Kashi

|

esakal

मूळ हस्तलिखित पत्रे

प्रकाश कावळे यांच्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या हस्ताक्षरातील मूळ ऐतिहासिक पत्रे आजही सुरक्षित आहेत.

Original Handwritten Letters of shivaji maharaj

|

esakal

उपाध्येपद बहाल

राज्याभिषेकानंतर महाराजांनी गोविंद भट यांना पैठणचे 'उपाध्येपद' देऊन या घराण्याचा सन्मान केला होता.

Conferment of Upadhyepan Title

|

esakal

दीर्घकालीन पत्रव्यवहार

भोसले घराणे आणि कावळे परिवार यांच्यातील हा पत्रव्यवहार शिवाजी महाराजांपासून हरजी भोसले यांच्यापर्यंत तब्बल २४० वर्षे सुरू होता.

Long-term Correspondence

|

esakal

११ पिढ्यांचा वारसा

कावळे परिवाराच्या सलग ११ पिढ्यांनी हा शिवकालीन वारसा अत्यंत निष्ठेने आणि जिवापाड जपला आहे.

Legacy of 11 Generations Gaga bhatt

|

esakal

वर्तमान वंशज

गागाभट्टांचे आत्ताच्या पिढीचे वंशज प्रकाश कावळे हे या अनमोल ऐतिहासिक ठेव्याचे मुख्य रक्षक म्हणून काम पाहत आहेत.

Gaga bhatt Present Descendant

|

esakal

इतिहासप्रेमींचा खजिना

या घराण्याकडे असलेली मूळ पत्रे इतिहास संशोधक आणि शिवप्रेमींसाठी अभ्यासाचा एक मोठा खजिना ठरली आहेत.

Treasure for History Lovers

|

esakal

साधेपणातील मोठेपण

नाथमंदिर परिसरातील एका साध्या गल्लीत राहूनही हे कुटुंब छत्रपतींच्या आठवणी आणि वारसा आजही जिवंत ठेवून आहे.

Greatness in Simplicity Gaga bhatt descendants

|

esakal

शिवा काशीद यांचे सध्याचे वंशज कोण अन् काय करतात? पाहा शिवरायांच्या वीर मावळ्याचा वारसा

shivaji maharaj soldier shiva kashid descendants

|

esakal

येथे क्लिक करा