Saisimran Ghashi
भगवान श्रीकृष्णाचे वंशज आजही भारतात आहेत.
वीरभद्र सिंह यांचे राजघराणे हे भगवान श्रीकृष्णाच्या १२३ व्या पिढीतील असून ते हिमाचल प्रदेशात वास्तव्यास आहेत.
श्रीकृष्णाचा मुलगा प्रद्युम्न सोनितपूरचा राजा होता, जे आजचे सराहन म्हणून ओळखले जाते.
वीरभद्र सिंह हे श्रीकृष्णाच्या १२२ व्या पिढीतील होते, तर त्यांचा मुलगा विक्रमादित्य सिंह १२३ व्या पिढीतील आहे.
विक्रमादित्य सिंह हे सध्या हिमाचल सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून कार्यरत आहेत.
या कुटुंबाचा हिमाचलच्या राजकारणावर खोल प्रभाव असून, अनेक निवडणुकांत त्यांनी यश मिळवले आहे.
वीरभद्र सिंह यांनी १९६२ मध्ये पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक जिंकली आणि पाच वेळा खासदार राहिले.
ते सहा वेळा हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री राहिले आणि अनेक विधानसभा मतदारसंघांतून निवडून आले.
त्यांची पत्नी प्रतिभा सिंह सध्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षा असून, मंडी मतदारसंघातून खासदार आहेत.
बुशहरच्या पदम राजवाड्यात ठेवलेली वंशावळ याची यांच्या वंशाची पुष्टी करते.