Monika Shinde
मिस वर्ल्ड 2025 स्पर्धा तेलंगणामध्ये होणार असून याची तयारी सुरू आहे. गेल्या वर्षी, मिस वर्ल्ड 2024 स्पर्धा मुंबईत झाली होती.
मिस वर्ल्ड स्पर्धेची सुरुवात 1951 मध्ये लंडनमध्ये झाली होती आणि तेव्हापासून आतापर्यंत 6 भारतीय महिलांनी मिस वर्ल्डचा ताज जिंकला आहे. चला तर मग, जाणून घेऊयात त्या कोण आहेत.
रिता फारिया ही 1966 मध्ये मिस वर्ल्ड स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय महिला होती. तिने 17 नोव्हेंबर 1966 रोजी मिस वर्ल्डचा ताज जिंकला.
ऐश्वर्या राय वयाच्या 28 वर्षांची असताना मिस वर्ल्ड बनली. 1994 मध्ये ऐश्वर्या रायने मिस वर्ल्डचा ताज जिंकला आणि जगभरात भारताचे नाव उज्जवल केले.
1997 मध्ये डायना हेडन हिने मिस वर्ल्ड स्पर्धा जिंकून तिसरी भारतीय म्हणून इतिहास रचला.
1999 मध्ये युक्ता मुखी हिने मिस वर्ल्डचा ताज जिंकला आणि भारतीय महिलांचे वर्चस्व कायम ठेवले.
2000 मध्ये प्रियंका चोप्राने मिस वर्ल्ड स्पर्धा जिंकली आणि भारताला एक मोठा मान मिळवून दिला.
प्रियंका चोप्रानंतर 17 वर्षांनी, 2017 मध्ये हरियाणाची मानुषी छिल्लर हिने मिस वर्ल्डचा ताज जिंकून भारतातील सहावी मिस वर्ल्ड म्हणून इतिहासात स्थान मिळवले.