सोलापूरचे चार हुतात्मे कोण?

Monika Shinde

सोलापूर

सोलापूर, महाराष्ट्राचं ऐतिहासिक शहर आहे, जे केवळ उद्योगासाठी प्रसिद्ध नाही, तर देशासाठी त्याच्या वीरतेची कहाणी देखील सांगतं

सोलापूरचे चार हुतात्मे

सोलापूरचे चार हुतात्मे हे कडवट देशप्रेमींचं प्रतीक आहेत, ज्यांनी आपले प्राण समर्पण केले.

चळवळीमुळे

या हुतात्म्यांच्या चळवळीमुळे सोलापूरकरांना चार दिवसांसाठी स्वातंत्र्य मिळाले होते.

कोण आहेत

सोलापूरचे चार हुतात्मे म्हणजे मल्लप्पा धनशेट्टी, किसन सारडा, जगन्नाथ शिंदे आणि अब्दूल रसूल कुर्बान हुसेन.

या हुतात्म्यांना

या चार हुतात्म्यांना १२ जानेवारी १९३१ रोजी येरवडा तुरुंगात फाशी देण्यात आली होती. त्यांच्या स्मृतीसाठी सोलापूरमध्ये हुतात्मा बाग आहे.

मल्लप्पा धनशेट्टी

मल्लाप्पा रेवणसिद्धप्पा धनशेट्टी हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक आणि क्रांतिकारक होते. त्यांनी ब्रिटिश साम्राज्याविरोधात उचललेली झुंज आजही स्मरणात आहे.

किसन सारडा

श्रीकिसन लक्ष्मीनारायण सारडा हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक आणि क्रांतिकारक होते. त्यांना किसन सारडा म्हणून ओळखले जाते.

जगन्नाथ शिंदे

हुतात्मा जगन्नाथ शिंदे यांचा जन्म १९०६ साली झाला. ते रेल्वे आणि गिरणी कामगार संघटनेत कार्यरत होते.

अब्दूल रसूल कुर्बान हुसेन

अब्दुल रसूल कुर्बान हुसेन हे सोलापूर येथील स्वातंत्र्य चळवळीतले पत्रकार होते. इंग्रजांनी त्यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील सहभागामुळे त्यांना फाशी दिलं.

भारतात पाकिस्तानचा ध्वज फडकवला तर काय शिक्षा होईल?

येथे क्लिक करा