Aarti Badade
प्रतापगडाच्या पायथ्याशी सजवलेल्या शामियान्याचे वैभव पाहून खान मत्सराने पेटला. "जहागीरदाराच्या मुलाने इतकी संपत्ती कोठून आणली?" असा सवाल त्याने पंताजी गोपीनाथांना विचारला.
Shivaji Maharaj vs Afzal Khan history Sayyid Banda attack
Sakal
राजे भेटीला येताच खान आलिंगन देण्यासाठी पुढे सरसावला. त्याने महाराजांची मान डाव्या बगलेत दाबून धरली आणि उजव्या हाताने त्यांच्या कुशीत कट्यार खुपसून दगा केला.
Shivaji Maharaj vs Afzal Khan history Sayyid Banda attack
Sakal
महाराजांनी चिलखतामुळे स्वतःचा बचाव केला आणि आपल्या जवळील वाघनखे खानाच्या पोटात खुपसली. खान "दगा, दगा" असे ओरडत असतानाच महाराजांनी खंजीर चालवून खानाचा कोथळा बाहेर काढला.
Shivaji Maharaj vs Afzal Khan history Sayyid Banda attack
Sakal
खानाचा आवाज ऐकताच त्याचा अंगरक्षक सय्यद बंडा तलवार घेऊन धावून आला. त्याने महाराजांवर अत्यंत वेगाने वार केला, जो महाराजांनी ढाल आणि तलवारीने अडवून स्वतःचे रक्षण केले.
Shivaji Maharaj vs Afzal Khan history Sayyid Banda attack
Sakal
सय्यद बंडा पुन्हा वार करणार इतक्यात महाराजांचे निष्ठावंत अंगरक्षक जिवा महाला यांनी चपळाईने सय्यद बंडाचा हात छाटून त्याला निमिषार्धात ठार केले आणि महाराजांचे प्राण वाचवले.
Shivaji Maharaj vs Afzal Khan history Sayyid Banda attack
Sakal
खानाला पालखीत घालून पळवून नेण्याचा प्रयत्न भोयांनी केला. परंतु महाराजांचे सरदार संभाजी कावजी कोंढाळकर यांनी भोयांचे पाय तोडले आणि खानाचे शीर कापून विजयी सलामी दिली.
Shivaji Maharaj vs Afzal Khan history Sayyid Banda attack
Sakal
याच धावपळीत खानाचा वकील कृष्णाजी भास्कर यानेही राजांवर वार करण्याचा प्रयत्न केला, परंतु राजांनी त्यालाही ठार केले. अशाप्रकारे प्रतापगडाच्या पायथ्याशी स्वराज्यावर आलेले हे मोठे संकट राजांनी परतावून लावले.
Shivaji Maharaj vs Afzal Khan history Sayyid Banda attack
Sakal
Lohagad Fort Pune
Sakal