Aarti Badade
भारतीय संस्कृती कोशानुसार, पंढरपूरचा उल्लेख इ.स. ५१५ मध्ये राष्ट्रकूट राजा अविधेयच्या ताम्रपटात ‘पांडरंगपल्ली’ असा आढळतो.
Pandharpur Vitthal Temple 900-Year History
Sakal
उपलब्ध ऐतिहासिक नोंदीनुसार, इ.स. ११८९ मध्ये पंढरपुरात विठ्ठलाचे पहिले छोटे मंदिर उभारले गेले.
Pandharpur Vitthal Temple 900-Year History
Sakal
इ.स. १२३७ मध्ये होयसळ यादव राजा वीर सोमेश्वर यांनी मंदिरासाठी कर्नाटकातील एका गावाचे दान दिल्याची नोंद आहे.
Pandharpur Vitthal Temple 900-Year History
Sakal
इ.स. १२७३ मध्ये यादव राजा रामचंद्रदेव आणि त्यांचे करणाधिपती हेमाद्रीपंडित यांनी मंदिराच्या विस्ताराला हातभार लावला.
Pandharpur Vitthal Temple 900-Year History
Sakal
यानंतर १६व्या, १७व्या आणि १८व्या शतकात मंदिरात वेळोवेळी नूतनीकरण आणि विविध बांधकामे करण्यात आली.
Pandharpur Vitthal Temple 900-Year History
Sakal
पंढरपूरच्या मध्यवर्ती भागातील उंच जागेवर असलेले हे पूर्वाभिमुख मंदिर पूर्वीपासून ‘विठ्ठल टेकडी’ म्हणून ओळखले जाते.
Pandharpur Vitthal Temple 900-Year History
Sakal
मंदिराला पूर्व, दक्षिण, पश्चिम आणि उत्तर दिशांना मिळून एकूण नऊ प्रवेशद्वार आहेत, त्यापैकी ‘नामदेव पायरी’ विशेष प्रसिद्ध आहे.
Pandharpur Vitthal Temple 900-Year History
Sakal
पूर्वेकडील महाद्वाराच्या पहिल्या पायरीशी संत नामदेवांची समाधी जोडली गेल्याने तिला ‘संत नामदेवांची पायरी’ असे म्हटले जाते.
Pandharpur Vitthal Temple 900-Year History
Sakal
मंदिरातील सोळाखांबी मंडप १६ दगडी खांबांवर उभा असून, त्यावर महाभारतातील प्रसंगांची शिल्पे पाहायला मिळतात.
Pandharpur Vitthal Temple 900-Year History
Sakal
गर्भगृहावरील त्रिस्तरीय शिखराची उंची सुमारे ४८ फूट असून, सध्याचे मराठा स्थापत्यशैलीतील शिखर १८३० मध्ये बांधले गेले.
Pandharpur Vitthal Temple 900-Year History
Sakal
अभ्यासकांच्या मते, आषाढी आणि कार्तिकी वारीची परंपरा किमान तेराव्या शतकापासून सुरू असल्याचे ऐतिहासिक उल्लेख आढळतात.
Pandharpur Vitthal Temple 900-Year History
Sakal
face pack skincare tips
Sakal