Sandip Kapde
कोकणातील सड्यांवर कोरलेली कातळशिल्पे ही अश्मयुगातील आदिमानवाच्या जीवनाची पहिली दृश्य नोंद मानली जाते.
katal shilpa
esakal
या कातळशिल्पांत प्राणी, पक्षी, मानवी आकृत्या आणि भूज्यामितिक रचना अशा विविध स्वरूपातील चित्रांची नोंद आढळते.
katal shilpa
esakal
कोकणातील ही चित्रे साधारणत, १० हजार वर्षांपूर्वीची असल्याचा पुरातत्त्व अभ्यासकांचा प्राथमिक अंदाज आहे.
katal shilpa
esakal
ही चित्रे नेमकी कोणत्या काळातली हे समजण्यासाठी लागणारी दगडी हत्यारे फारच थोड्या ठिकाणी सापडली असल्याने डेटिंग अद्याप अपूर्ण आहे.
katal shilpa
esakal
कोकणाच्या इतिहासातील इ.स.पूर्व ४० हजार ते इ.स.पूर्व ३००० या ‘डार्क एज’मध्ये मानव कसा होता हे समजण्यासाठी ही शिल्पे महत्वाची किल्ली ठरत आहेत.
katal shilpa
esakal
कातळशिल्पांत शेतीचे कोणतेही दृश्य नाही, त्यामुळे त्या काळातील मनुष्य मुख्यतः शिकारीवर अवलंबून असल्याचे दिसते.
katal shilpa
esakal
काही चित्रांतील प्रचंड आकारमान आणि सूक्ष्म भूमितीय प्रमाण पाहता या आदिमानवाला प्राथमिक भूमितीची जाणीव असावी असे संकेत मिळतात.
katal shilpa
esakal
वेगवेगळ्या ठिकाणच्या शिल्पांतून कलाशैलीतील बदल दिसतात, यावरून कातळशिल्पांची परंपरा अनेक पिढ्यांत विकसित झाल्याचे स्पष्ट होते.
katal shilpa
esakal
गेंडा आणि पाणघोड्यासारख्या कोकणात न आढळणाऱ्या प्राण्यांची ज्ञानेषणा चित्रांत दिसते, यामुळे प्राचीन स्थलांतराचा किंवा भूप्रदेशातील बदलाचा संशय व्यक्त होतो.
राज्य सरकारने ४०० कातळशिल्पांच्या अभ्यास व संवर्धनासाठी अर्थसंकल्पात निधी मंजूर करून कोकणातील या वारशाला नवा वेग दिला आहे.
katal shilpa
esakal
सुधीर रिसबूड आणि मनोज मराठे यांसारख्या स्थानिक अभ्यासकांच्या धडपडीने ५२ गावांतील शेकडो कातळशिल्पे जगासमोर आली.
katal shilpa
esakal
या कातळशिल्पांचा उलगडा झाल्याने कोकणाचा सांस्कृतिक इतिहास अधिक समृद्ध झाला असून महाराष्ट्राच्या प्राचीन वारशात त्यांचे ‘वैभव’पूर्ण स्थान निश्चित झाले आहे, बीबीसी मराठीने याबाबत वृत्त दिले होते.
katal shilpa
esakal