'जय भीम' नारा भारतात पहिल्यांदा कोणी दिला? जाणून घ्या 'या' शब्दाचा ऐतिहासिक प्रवास?

Aarti Badade

अभिमान आणि विचारांची ओळख

आज 'जय भीम' हा केवळ एक शब्द राहिला नसून, तो कोट्यवधी लोकांसाठी स्वाभिमान, समता आणि क्रांतीचा एक प्रबळ विचार बनला आहे.

History of Jai Bhim slogan

|

Sakal

नाऱ्याचा जन्म आणि प्रेरणा

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मूळ नाव 'भीमराव' होते. त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यांच्या स्मरणार्थ 'जय भीम' हा नारा जन्माला आला.

History of Jai Bhim slogan

|

Sakal

कोणी दिला हा नारा?

हा ऐतिहासिक नारा बाबू हरदास एल. एन. यांनी दिला. ते बाबासाहेबांचे अत्यंत निष्ठावान सहकारी आणि चळवळीतील सक्रिय नेते होते.

History of Jai Bhim slogan

|

sakal

१९३५ - चळवळीला मिळाली नवी दिशा

१९३५ च्या सुमारास बाबू हरदास यांनी 'जय भीम' या शब्दाची गुंफण केली आणि बघता बघता या एका शब्दाने संपूर्ण चळवळीत चैतन्य निर्माण केले.

History of Jai Bhim slogan

|

Sakal

संघर्षातील महत्त्वाचे योगदान

बाबू हरदास यांनी नाशिकचा काळाराम मंदिर सत्याग्रह आणि महाडचा चवदार तळे सत्याग्रह यांसारख्या ऐतिहासिक आंदोलनांमध्ये बाबासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून काम केले.

History of Jai Bhim slogan

|

Sakal

समता सैनिक दलाची भूमिका

समता सैनिक दलाच्या माध्यमातून हा नारा गावोगावी पोहोचला. शिस्तबद्ध सैनिकांच्या अभिवादनाचा हा अधिकृत आवाज बनला आणि घराघरात पोहोचला.

History of Jai Bhim slogan

|

Sakal

जागतिक स्तरावर जयघोष

महाराष्ट्रातून सुरू झालेला हा जयघोष आज संपूर्ण भारतभर आणि परदेशातही स्वाभिमानाचे प्रतीक म्हणून मोठ्या अभिमानाने दिला जातो.

History of Jai Bhim slogan

|

Sakal

Chanakya Niti : यशाचं 'हे' एक गुपित बदलेल तुमचं नशीब!

Chanakya Niti for success

|

sakal

येथे क्लिक करा