सकाळ वृत्तसेवा
३२ मण सोन्याचे थाटामाटाचे सिंहासन! कोणी बनवले आणि का खास आहे हे सिंहासन, ते जाणून घ्या.
इ.स. १६५६ मध्ये शिवरायांनी रायगड किल्ला स्वराज्यात घेतला. राज्याभिषेकासाठी याच गडाची निवड झाली.
राज्यकारभारासाठी अठरा कारखाने, महाल, बाजारपेठ आणि दरबार रायगडावर उभारले गेले.
शिवरायांनी रामाजी दत्तो यांची नेमणूक रत्नशाळेच्या प्रमुखपदी केली. सिंहासन बनवण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती.
इ.स. १६७३ पासून सुवर्ण सिंहासन तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली – राज्याभिषेकाच्या वर्षभर आधी!
सिंहासन तयार करताना ३२ मण सोनं वापरलं गेलं. रत्नशाळेतील मौल्यवान रत्नांचा वापरही झाला.
‘अब्राहम ले फेबर’ या डच अधिकाऱ्याने राज्याभिषेकाविषयी पत्र लिहिले. त्यात सिंहासनाचे नाव ‘शिवराज’ असे नमूद होते!
हे सिंहासन भव्य, रत्नजडित आणि सोन्याच्या तेजाने झळकणारे होते. ते शिवरायांच्या सत्तेचे प्रतीक बनले.
डच वखारीच्या नोंदीनुसार सिंहासनाचे अधिकृत नाव ‘शिवराज’ होते. हे नावच शिवरायांच्या स्वराज्याच्या तेजाची साक्ष देते.